शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम -२४}चिंचणी , ता. शिरूर येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ४८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत गौरव बापु पवार (वय २८, व्यवसाय-शेती, रा. चिंचणी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११ वाजता ते दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान, पवार यांच्या घराच्या किचन रूमलगतच्या खोलीचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडले. घरातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले दीड तोळे वजनाचे सोन्याचे गंठण (किंमत ४५,००० रुपये) व पाच तोळे वजनाचे चांदीचे पैजण (किंमत ३,००० रुपये) असा एकूण ४८,००० रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला.
बांधकाम व्यवसायिक व माहेश्वरी समाज शिरूर चे अध्यक्ष संदीप बिहाणी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्रमांक ६७३/२०२५ भा.न्या.सं. ३०५, ३३१(४) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनखाली हवालदार टेंगले करत आहेत.