राष्ट्रीयविशेष

माणुसकीचा किरण, सेवाभावाचा मार्ग, साधेपणात लपलेलं सोन्यासारखं तेज ।। गरीब-श्रीमंत सर्वांसाठी समान उपचार, डॉ. किरण बाबुराव तरटे – प्रेरणादायी आधार

दिनांक 4 ऑक्टोंबर जन्मदिवस निमित्त लेख

आयुष्यामध्ये जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती काही ना काही काम धंदा करून गुजराण करत असते. आपलं जीवन जगताना पैसे कमावताना ते कुठल्या मार्गाने कमवायचे हा ज्याच्या त्याच्या चॉईसचा विषय व संस्काराचा भाग. त्यामुळे अनेक जण शॉर्टकट दिसत असताना ही यशाच्या करिता शॉर्टकट चा वापर न करता आपल्या ध्येय धोरणानुसार तत्त्वानुसार इथिक नुसार आपला जीवन मार्ग निवडतात. याचा कुठेही बडे जाव न करता, साधेपणाने नम्रपणे आपले जीवन जगतात.खरंतर या व्यक्तींचे व्यक्तिमत्व हे सोन्याच्या लकाकी सारखं असतं.परंतु ते मात्र अत्यंत नम्रपणे सचोटीने आपले जीवन व्यतित करतात नव काही शिकण्याची उर्मी त्यांच्या अंगी असते. इतराचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणे,अभ्यासाने प्रगटणे व मोजके व मुद्देसूद बोलणे, आपला वेळ आपल्या विषयाचा अभ्यासामध्ये घालवणे, आपली वैचारिक बैठक ही सातत्याने सुधारत नेणे, समाजाच्या कामासाठी पुढाकार घेणे. प्रचंड विद्वत्ता असतानाही नवीन शिकण्यासाठी तयार असणे व इतरांच्या आदर व्यक्त करणे व सतत आपल्या कामात राहून आपले काम प्रामाणिकपणे करणे असं व्यक्तिमत्व म्हणजे शिरूर मधील खारेमळा येथील डॉ. किरण बाबूराव तरटे.

करोना काळात अनेकांना करोना मुक्त करून ही त्याचे कुठेही डिम डिम न वाजवणारे, ना कुठला सत्कार,सन्मान स्वीकारणारे डॉ.किरण हे जगावेगळे अवलिया आहे
त्यांचे कमी व मोजके बोलणे असले तरी त्यांचे परिचित व रुग्णांना डॉक्टर किती संवेदनशील, मायाळू आहेत याची प्रचिती आहे. कमी बोलणे हा त्यांचा नम्रतेचा भाग आहे. बोलणे कमी व कृती जास्त हा त्यांच्या जगण्याचा मूलमंत्र आहे.
डॉक्टरकी पेशा व्यवसाय म्हणून न करता ते सेवा म्हणून करतात. त्यामुळे रुग्णांना गरजेपुरतेच औषध देणारे आवश्यकतेनुसारच ऍडमिट करून घेणारे जगावेगळे असणारे डॉक्टर किरण.
पेशंट गरीब असो व्हीआयपी असो अथवा करोडपती असो डॉक्टरांकडे कोण्या विषयी दुजाभाव नाही. सर्वांविषयी एकच भाव त्यामुळे सामान्य पेशंटचे तेवढीच आपुलकीने चौकशी आणि उपचार व वेळ व व्हीआयपी पेशंटलाही तेवढीच वेळ.
वैद्यकीय पेशा असून सुद्धा आवर्जून वेळ काढून गिर्यारोहण, डोंगर गड किल्ल्यांची भ्रमंती हा डॉक्टरांचा आवडता छंद.महाराष्ट्रातील अनेक गडकोट किल्ले त्यांनी पाहिले. सायकलिंग त्याचबरोबर नियमित व्यायाम, मेडीटेशन योगा व मित्रांबरोबर मनसोक्त भटकंती व गप्पा यातच आनंद शोधणारे डॉक्टर खरंतर आम्हा मित्रांच्याच नाही तर रुग्ण व समाजाच्याही दृष्टीने आशेचा ऊर्जेचा व आनंदाचा किरण आहे.पुणे शहरात प्रतिथयश मोठया दावाखान्यात कार्यरत असतानाही आपल्या ग्रामीण भागातील लोकांना वैद्यकीय सेवा देण्याचा हेतूने त्यांनी शिरूर शहरात दवाखाना सुरु केला.
नव शिकण्याची हौस,मानवी मन जाणून घेणे,मानवी ताणतणाव मानवी भावनांचे विश्व जाणून घेणे त्यांना आवडते.
माणूस करियर झाल्यानंतर नवे शिकण्याचे,नवीन जाणून घेण्याचे टाळतो. आपल्याकडे जे ज्ञान आहे तेच खूप आहे असे त्याला वाटते व नवीन काही शिकण्यात आपल्याकडे वेळ नाही यासारखी विविध कारणे तो सांगत असतो. पण डॉक्टर किरण याला मात्र अपवाद आहे. ढीगवर कामे व वैद्यकीय व्यवसायात थोडीही उसंत नसताना डॉक्टर किरण मात्र आवर्जून वेळ काढून नवीन काही शिकण्यासाठी धडपडतात हे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
शिरूर श्रीगोंदा पारनेर एवढेच काय तर राज्यभरातून डॉक्टर किरण यांच्याकडे मोठ्या विश्वासाने रुग्ण येतात व उपचार करून घेतात डॉक्टर किरण म्हणजे शिरूरच्या वैद्यकीय विश्‍वातील एक विश्वासनीय नाव व एक नवीन इतिहास घडवणारे व्यक्तिमत्व आहे हे मात्र निश्चित.
यश,कीर्ती, पैसा, मान,सन्मान हे सर्व काही असताना जमिनीवर राहून काम करणे हे फार अवघड. भल्याभल्यांना हे सांभाळणे अवघड जाते. यशाची हवा डोक्यात जाते व आपण जेथून आलो आहोत त्याचे भान हरपले जाते परंतु डॉक्टर किरण मात्र जमिनीवर राहून आभाळभर आपल्या कार्याची व्याप्ती वाढवतात यामागे त्यांच्यातील सदगुण आहेत त्याचबरोबर त्यांच्या आई-वडिलांचे व शिक्षकांचे झालेले संस्कारही तेवढेच महत्त्वाचे आहेत.
डॉ. किरण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button