Uncategorizedक्राईम

दारू पिताना झालेल्या वादातून मित्राचा खून; शिरूर पोलिसांची परजिल्ह्यातील आरोपीस बेड्या

डी. बी. पथकाची जलद कारवाई – विधीसंघर्षित बालकाचाही सहभाग

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून मित्राचा गळा दाबून खून करून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत पाण्यात टाकणाऱ्या आरोपीस शिरूर पोलिसांनी  परजिल्ह्यातून अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारास शिरूर (ता. शिरूर, जि. पुणे) येथील  प्रीतम प्रकाश नगर मधील पांजरपोळच्या जागेतील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात एका इसमाचा मृतदेह आढळला. मृताची ओळख अशोक तात्या खंडागळे (वय ३१, रा. बोराडेमळा, शिरूर) अशी पटली.

भारतीय जनता पक्षाचे माजी शहाराध्यक्ष ललितजी नहार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

याबाबत मृताचे नातेवाईक सत्यवान विष्णू पखाले यांनी शिरूर पोलिसांकडे फिर्याद दिली होती.

सुरुवातीला या घटनेचा अकस्मात मृत्यू (A.D. नं. १२९/२०२५) म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र ग्रामीण रुग्णालय, शिरूर येथील डॉक्टरांनी दिलेल्या पोस्टमॉर्टम अहवालात मृत्यू पाण्यात बुडल्याने नसून, मृत्यूपूर्वी शारीरिक जखमा असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी तपास सुरू केला.

तपासादरम्यान मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक पुरावे यांवरून असे निष्पन्न झाले की, मृत अशोक खंडागळे याचा त्याचा मित्र आकाश ज्ञानेश्वर लोहार (रा. शिरूर) व त्याचा एक मित्र (विधीसंघर्षित बालक) यांच्याशी दारू पिताना वाद झाला होता. हा वाद वाढल्याने दोघांनी अशोकचा गळा आवळून त्याचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रेत पाण्यात टाकून पळून गेले.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं. ७२५/२०२५ भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०३, २३८, व ३(५) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.

शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती शिरूर वकील संघटनेचे माजी अध्यक्ष प्रदीप तुकाराम बारवकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शुभम चव्हाण, पीएसआय दिलीप पवार, पो. ह. नाथसाहेब जगताप, अक्षय कळमकर, तसेच अंमलदार सचिन भोई, विजय शिंदे, नितेश थोरात, निखील रावडे, निरज पिसाळ, अंबादास थोरे व अजय पाटील यांचे पथक तयार करण्यात आले.

या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा मागोवा घेत, परजिल्ह्यातील कौठाळी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथे आरोपी आकाश लोहार यास आणि शिरूर परिसरातून विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी खुनाची कबुली दिली.

आरोपी आकाश ज्ञानेश्वर लोहार (वय २५) यास अटक करून न्यायालयात हजर केले असता, १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. तसेच विधीसंघर्षित बालकास बालन्याय मंडळ, येरवडा, पुणे यांच्यासमोर हजर करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button