Uncategorized

शिरूर बसस्थानकात वृद्ध महिलेकडील ६७ हजार रुपयांचे सोन्याचे गंठण चोरीला अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम }
शहरातील बसस्थानक परिसरात दुपारच्या वेळेत एका वृद्ध महिलेकडील ६७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सौ. लता सुदाम जामदार (वय ६५, रा. कुंभारआळी, शिरूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ ते १२.३० या दरम्यान त्या शिरूर बसस्थानक परिसरात असताना

शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती शिरूर वकील संघटनेचे माजी अध्यक्ष प्रदीप तुकाराम बारवकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹

अज्ञात चोरट्याने त्यांच्या पिशवीची चैन उघडून आत ठेवलेले सोन्याचे गंठण चोरले. या गंठणाचे वजन दीड तोळे असून किंमत अंदाजे ६७ हजार ५०० रुपये एवढी आहे.

भारतीय जनता पक्षाचे माजी शहाराध्यक्ष ललितजी नहार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

या चोरीची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ७३०/२०२५ भा.दं.सं. कलम ३८० अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.यासंदर्भात पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार जगताप करत असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button