Uncategorized

शिरूर पंचायत समितीच्या 14 गणांचे आरक्षण जाहीर

कारेगाव रांजणगाव गणपती शिक्रापूर रांजणगाव सांडस व न्हावरा गण सर्वसाधारण

oplus_131074

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम-24}
पंचायत समितीच्या १४ जागासाठी आज शिरूर येथे सोडत काढण्यात आली.
शिरूर तहसीलच्या हॉल मध्ये झालेल्या या सोडतीस प्रातांधिकारी उत्तम जोशी, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के आदी उपस्थित होते.स्वंयम प्रकाश फरगडे यांचा हस्ते चिठ्ठी काढण्यात आल्या .
शिरूर पंचायत समितीचे सभापती पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. गावगाडा मध्ये महत्वाच्या असणा-या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका महत्वाचा आहेत. मागील काही वर्षापासुन स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका झाल्या नसल्याने या निवडणूकी संदर्भात मोठी उत्सुकता आहे. राजकीयदृष्टया महत्वाचा असणा-या , कारेगाव, रांजणगाव गणपती व न्हावरा शिक्रापूर हे गट सर्वसाधारण राहिल्याने निवडणूक चूरशीची होणार आहे. माजी आमदार अशोक पवार यांच्या वडगाव रासाई गट अनुसूचित जाती करिता राखीव झाला आहे. दिवगंत माजी आमदार बाबूराव पाचरणे व बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे यांच्या शिरूर ग्रामीण व माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या टाकळी हाजी गट हा ओबीसी महिला प्रवर्गा साठी राखीव झाला आहे.माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर व राष्ट्र वादी काँग्रेस आंबेगाव चे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या रांजणगाव गणपती गट खुल्या राहिला आहे. जनता दल धर्मनिरपेक्षचे नाथा शेवाळे व संग्राम शेवाळे माजी सभापती विश्वास कोहकडे यांच्या कारेगाव गण ही सर्वसाधारण झाला आहे. पैलवान मंगलदास बांदल त्याचबरोबर रामभाऊ सासवडे यांचा शिक्रापूर गण ही सर्वसाधारण आहे. त्याच बरोबर दादापाटील फराटे यांचे गाव असणारा मांडवगण फराटा गट हा सर्वसाधारण महिला साठी राखीव झाला आहे.
गण निहाय आरक्षण पुढिल प्रमाणे –
शिरूर ग्रामीण -ओबीसी महिला
पाबळ – ओबीसी
टाकळी हाजी -ओबीसी महिला
वडगाव रासाई – अनुसूचित जाती
मांडवगण फराटा – सर्वसाधारण महिला
तळेगाव ढमढेरे – सर्वसाधारण महिला
सणसवाडी- सर्वसाधारण महिला
कवठे येमाई – सर्वसाधारण महिला
केंदुर – सर्वसाधारण महिला
सर्व साधारण – कारेगाव, शिक्रापूर, न्हावरा,रांजणगाव सांडस, रांजणगाव गणपती, कारेगाव

चौकट

राजकीय दृष्टया महत्वाच्या असणारे गावे असणारी गण हे सर्वसाधारण झाल्याने अनेक दिग्गज नेते निवडणूक रिंगणात उतरतील असे बोलले जात आहे. आजच्या या सोडती कडे अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यानी अनुपस्थिती लावली. माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, भाजपचे माऊली साकोरे आदी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button