

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम -24}
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा शिरूर येथे पार पडल्या. पुणे, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यातील १३० हुन अधिक स्पर्धक यात सहभागी झाले होते.
या स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या स्पर्धेकांची नाशिक येथे होणा-या विद्यापीठस्तरीय पातळी वरील स्पर्धे साठी निवड झाली.
येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या मैदानावर या विभागीय क्रीडा महोत्सवचे उदघाट्न यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठचे विभागीय संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड व शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, उपप्राचार्य हरिदास जाधव, केंद्र संयोजक डॉ. अंबादास केत, केंद्र सल्लागार प्रा. चंद्रकांत धापटे, प्रा. डॉ. दत्ता बोबडे, मुक्त विद्यापीठा तील अधिकारी संतोष वामन,संतोष कडबाने, यश धनगर, क्रीडा शिक्षक डॉ. अप्पासाहेब चव्हाण, निळोबा भोगावडे आदी उपस्थित होते.
क्रीडा स्पर्धेची ज्योत राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू ऋतुजा बनकर यांनी आणली.
नंदकुमार निकम म्हणाले की आयुष्यात खेळाला ही महत्व आहे. खेळाडूनी स्पर्धेत सहभागी होण्याचा आनंद घेण्या बरोबरच स्पर्धेत जे खेळाडू चांगली कामगिरी करतात. त्याचे निरिक्षण करा व त्याच्यातील खेळाचे नि्रीक्षण करून आपल्या खेळातील कौशल्य व नैपुण्य वाढवावे.
डॉ. गायकवाड यांनी नाशिक येथील विद्यापीठ स्तरावर होत असलेल्या स्पर्धे विषयी व विदयापीठ घेत असलेल्या विविध स्पर्धा व उपक्रमांची माहिती दिली.
प्राचार्य डॉ. मोहिते यांनी बोरा महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली.
प्रास्ताविक प्रा. डॉ. अंबादास केत यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. क्रांती पैठणकर यांनी केले. आभार प्रा. चंद्रकांत धापटे यांनी मानले.