Uncategorizedराष्ट्रीयविशेष

पिंपरखेड येथे साडे पाच वर्षाच्या बिबटया जेरबंद

पिंपरखेड येथे बिबटयाच्या हल्ल्यात पाच वर्षाची बालिका मृत्यूमुखी पडली होती.

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}पिंपरखेड, ता. शिरूर येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात साडेपाच वर्षाच्या शिवन्या शैलेश बोंबे वय साडेपाच वर्ष रा. पिंपरखेड, ता. शिरूर, जि. पुणे ही मरण पावली होती.

आज दिनांक सोमवार दिनांक १३ ऑक्टो रोजी सकाळी सातच्या सुमारास पिंपरखेड येथे बिबट्यास पकडण्यासाठी लावलेल्या पिंजरात बिबटया जेरबंद झाला. पकडण्यात आलेल्या बिबट्या साडेपाच ते सहा वर्षाचा असुन ती मादी असल्याचे तालुका वनाधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी सांगितले.
रविवार दिनांक दहाच्या सुमारास घडली. शेतकरी अरुण देवराम बोंबे यांच्या घरामागे असणारा शेतात जेसीबीचे काम चालू होते. या कामाचा ठिकाणी आजोबा अरुण यांना शिवन्या पिण्यासाठी पाणी घेऊन जातं असताना उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तीचा वर झडप घातली व काही क्षणात शिवन्याला तोंडात धरून बिबटयाने उसाच्या शेतात धूम ठोकली. आजोबा अरुण यांनी शिवन्या हिला बिबटयाने उचलून शेतात नेल्याचे पाहिल्यावर ते ही उसाच्या शेतात बिबटयाचे मागे गेले. व बिबटयाच्या तावडीतून शिवन्याची सुटका केली.
बिबटयाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शिवन्यास उपचारासाठी मंचर येथे नेण्यात आले. उपचारापुर्वीच तीचा मृत्यू झाला होता.
वनाधिकारी गव्हाणे यांनी सांगितले की पिंपरखेड या घटनास्थळी बिबटयास जेरबंद करण्यासाठी 11 पिंजरे लावण्यात आले आहेत . त्याचबरोबर दोन लाईव्ह कॅमेरे,दोन ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आले आहेत. त्याखेरीज वाइल्ड लाईफ यांची टीम घटनास्थळी दाखल आहे.
सहाय्यक वनरक्षक स्मिता राजहंस त्याचबरोबर उप वनरक्षक प्रशांत खाडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती शिरूर वकील संघटनेचे माजी अध्यक्ष प्रदीप तुकाराम बारवकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹
भारतीय जनता पक्षाचे माजी शहाराध्यक्ष ललितजी नहार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शासनाच्या नियमानुसार बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीस 25 लाखाची नुकसान भरपाई दिले जाते. त्यानुसार धनादेश देण्यात येणार असल्याचे तालुका वनाधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी सांगितले.
मागील काही वर्षापासून शिरूर तालुक्यातील बिबट्याचा वावर आणि उपद्रव वाढला आहे. आता शिरूर तालुक्याची ओळख बिबट्याचा वावर असणारा तालुका अशी होवू लागली आहे. पूर्वी शिरूर तालुक्यातील जांबूत,पिंपरखेड, टाकळी हाजी, फाकटे, कवठे येमाई या बेट भागात असणारा बिबट्याचा वावर मांडवगण फराटा, वडगाव रासाई,पिंपळसुटी,इनामगाव, न्हावरा या पूर्व भागात ही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button