Uncategorizedविशेष

आयटीसी कंपनीमार्फत दिव्यांगांसाठी मोफत कौशल्य विकास व रोजगार संधी कार्यक्रम

२० विद्यार्थ्यांना विविध खाजगी आस्थापनांतर्फे नियुक्तीपत्रे

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}
आयटीसी कंपनी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर येथे ‘आयटीसी सुनहरा कल’ या सामाजिक उपक्रमांतर्गत दिव्यांगांसाठी मोफत कौशल्य आणि उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मळगंगा इन्फोटेक ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन, शिरूर येथे तीन महिन्यांच्या कालावधीत हा प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.
या उपक्रमांतर्गत शिरूर तालुक्यातील एकूण ५० दिव्यांग विद्यार्थ्यांना डेटा एंट्री ऑपरेटर या अभ्यासक्रमाचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांना संबंधित विषयांचे सखोल ज्ञान, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि उद्योजकता विकास प्रशिक्षणही देण्यात आले.
या प्रशिक्षणाचा समारोप आणि प्रमाणपत्र वितरण समारंभ विजय माला विद्या मंदीर इंग्लिश स्कूल, शिरूर येथे संपन्न झाला. या प्रसंगी २० विद्यार्थ्यांना विविध खाजगी आस्थापनांतर्फे नियुक्तीपत्रे देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय माला विद्या मंदीर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या मारीया साठे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सचिन पालमवार, जनरल मॅनेजर, ICML फूड फॅक्टरी उपस्थित होते. तसेच ITC कंपनीचे मुनेश सक्सेना (सिनियर प्रोग्राम मॅनेजर), सायली कदम (सिनियर प्रोग्राम ऑफिसर), तसेच सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे डॉ. मनोज कुलकर्णी (प्रकल्प समन्वयक) व श्री. वैभव निमगिरे (प्रकल्प व्यवस्थापक) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनोज कुलकर्णी यांनी केले, तर प्रास्ताविक वैभव निमगिरे यांनी करत प्रशिक्षण उपक्रमाचा आढावा सादर केला.
अध्यक्षीय भाषणात मारीया साठे यांनी विद्यार्थ्यांना “स्वतःवर, आपल्या क्षमतेवर आणि स्वप्नांवर विश्वास ठेवा” असे मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे सचिन पालमवार यांनी “आजच्या डिजिटल युगात केवळ प्रशिक्षणावर न थांबता नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा” असा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयटीसी कंपनीचे मुनेश सक्सेना, सायली कदम, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, प्रकल्प संचालिका सोनाली भट्टाचारजी, तसेच मळगंगा इन्फोटेकचे संचालक शुभांगी लंके व महेश लंके यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

भारतीय जनता पक्षाचे माजी शहाराध्यक्ष ललितजी नहार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती शिरूर वकील संघटनेचे माजी अध्यक्ष प्रदीप तुकाराम बारवकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹


कार्यक्रमाचा समारोप आणि आभार प्रदर्शन सायली कदम यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button