Uncategorizedविशेष

शिरूर नगरपरिषद निवडणूक : मतदार यादीवरील हरकतींसाठी मुदतवाढ

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवरील हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत नागरिकांना त्यांच्या नावाविषयी किंवा तपशिलाविषयी हरकती, सूचना नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नगरपरिषद प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत नगरपरिषद कार्यालयात स्वीकारल्या जाणार आहेत. मतदारांच्या नावात, पत्त्यात बदल, दुबार नोंद, अथवा इतर कोणत्याही त्रुटी असल्यास संबंधितांनी विहित नमुन्यात अर्ज भरून नगरपरिषदेत सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाणार असून, सर्व नागरिकांनी आपले नाव यादीत योग्यरित्या समाविष्ट आहे याची खात्री करून घ्यावी, असे नगरपरिषदेच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button