Uncategorizedराष्ट्रीयविशेष

श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळ आयोजित सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रक्तदान शिबिरात 51 जणांचे रक्तदान तर आरोग्य तपासणी शिबिरात 150 हून अधिक जणांची आरोग्य तपासणी

रक्तदान शिबिर प्रसंगी जैन धर्मगुरू गौतम जी महाराज साहब उपस्थित होते.

 

शिरूर दिनांक (डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
हलवाई श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळ यांच्या सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सव वर्षानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 51 जणांनी तर आरोग्य तपासणी शिबिरात 150 हून अधिक जणांनी सहभाग घेतला.
श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचे यंदा सुवर्ण महोत्सव यानिमित्ताने विविध धार्मिक सामाजिक व आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संजीवनी रक्तपेढी यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर पार पडले तर मीरा नर्सिंग होम चे डॉ. संतोष पोटे व डॉ. सुनिता पोटे यांनी रक्तगट तपासणी,रक्तदाब, शुगर कोलेस्ट्रॉल व जनरल आरोग्य तपासणी केली यात 150 हून अधिक जणांनी सहभाग घेतला.
आरोग्य तपासणी शिबिरात ३० हुन अधिक शिरूर नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
रक्तदान शिबीरात आई पूनम श्यामलाल परदेशी व मुलगा साई श्यामलाल परदेशी यांनी प्रथमच रक्तदान केले.तर सचिन सुभाष पुजारी व गौरव सचिन पुजारी या पितापुत्राने ही रक्तदान केले. प्रा. सतीश धुमाळ यांनी ही ७१ वे रक्तदान केले.
जैन धर्मगुरु गौतममुनीजी महाराज, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य
राहुल बाबुराव पाचर्णे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण, रमाकांत बोरा, भाजपाचे माजी शहराध्यक्ष केशव लोखंडे, मनसेचे माजी शहराध्यक्ष संदीप कडेकर, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती तुकाराम खोले, भारतीय कृषक समाज पुणे जिल्हाध्यक्ष प्रा.विलास आंबेकर, माजी उपसरपंच गणेश खोले,  अडव्होकेट बाबुराव पाचंगे, मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे,कपिल बोरा, खुशाल गाडे, फिरोज बागवान, मुकुंद ढोबळे, आदीनी भेट दिली.
मंडळाचे अध्यक्ष अशोक काळे, रणजीत गायकवाड, अविनाश जाधव, सिकंदर मण्यार, प्रेम मुसळे, शाम परदेशी, राकेश परदेशी आदी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button