Uncategorized
शहरातील प्रलंबित असलेल्या नागरी समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी “घंटानाद सत्याग्रही आंदोलन”
या विविध प्रश्नान संदर्भात संबंधित विभागाशी बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु असे मुख्याधिकारी यांचे आश्वासन






त्याच जागेवर पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत आदर्श पुनर्वसन प्रकल्पानुसार पुनर्वसन करावे, आणि अशा उपाययोजनांचा आराखडा होईपर्यंत या वस्त्यांवर कोणत्याही प्रकारची अतिक्रमणविरोधी कारवाई करण्याला स्थगिती दयावी, तसेच या ठिकाणी नागरिकांच्या सोयीकरीता पुरेशा संडास बाथरुमची व्यवस्था करावी.शिरुर गावातुन बाबुरावनगर कडे जाणा-या (सी.टी. बोरा कॉलेज रोड), डी. पी. रोडवरील सर्व प्रकारचे अडथळे जसे की विजेचे खांब व डि. पी. स्ट्रक्चर, पुणे-नगर बायपास करीता केलेल्या भरावाची संरक्षक भिंत आणि इतर अतिक्रमणे काढून हा रस्ता पादचारी आणि वाहतुकीकरीता पुरेसा रुंद आणि सोयीचा करावा, येथील भुयारी मार्गाजवळील चेंबरवरील झाकणे योग्य त्या इंजिनिअरींग डिझाईननुसार बसवावीत.
शिरुर ग्रामीण रुग्णालयाला १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याबाबतची कार्यवाही त्वरित करावी, आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये महिलांच्या प्रसुतीकरीता पूर्णवेळ प्रसूती तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करून आणि येथे स्वतंत्र आणि आधुनिक प्रसुती कक्ष उभारण्यात यावा. हुडको वसाहतीला गेली २५ वर्षापासून दररोज पहाटे ४.०० वा. पिण्याचे पाणी येते, त्याची वेळ महिलांच्या सोयीची व्हावी याकरीता हुडको वसाहतीकरीता एक स्वतंत्र पाण्याची टाकी करावी व नागरिकांच्या सोयीच्या वेळी पाणी पुरवठा करण्यात यावा. हुडको वसाहतीजवळील सर्वे नंबर ११४० मधील १ हेक्टर सरकारी जागेला तातडीने कुंपन घालावे, येथील रिकाम्या मैदानाचा वापर परिसरांतील मुले, शाळेतील मुले खेळाचे मैदान म्हणून वापर करीत आहेत. सदरच्या जागेवरील दत्तमंदिराची इमारत सुमारे ३५ वर्षांपूर्वीची असून तिची देखभाल दुरुस्ती करण्याची परवानगी दयावी आणि त्या ठिकाणी पाण्याचे कनेक्शन आणि मैदानाच्या जागेवर विद्यार्थ्यांच्या वापराकरीता पोर्टेबल (तात्पुरते) संडास बाथरूम उभारण्याची परवानगी देण्यात यावी.