Uncategorized

श्री स्वामी समर्थ मंदिर प्रीतम प्रकाश नगर शिरूर येथे दिवाळी निमित्त   ‘स्वामी पहाट ’ कार्यक्रम

प्रसिद्ध गायक गणेश मराठे यांच्या भक्तिगीतांनी गाजणार दिवाळीची पहाट

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}श्री स्वामी समर्थ सेवा संस्था, शिरूर यांच्या वतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर “स्वामी पहाट ” हा भक्तिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्वामीभक्तांच्या सहवासात सकाळची सुरूवात भक्तिगीतांच्या माधुर्याने होणार आहे.

हा कार्यक्रम बुधवार, दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ५.३० ते ६.३० या वेळेत श्री. स्वामी समर्थ मंदिर, प्रितम प्रकाश नगर, शिरूर येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमात ओंकार संगीत विद्यालयाचे प्रसिद्ध गायक श्री. गणेश मराठे व त्यांचे सहकारी सुमधुर भक्तिगीतांचा सुरेल कार्यक्रम सादर करणार आहेत.संस्थेच्या वतीने दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर भक्तिभाव जागवणारा हा कार्यक्रम आयोजित केला जातो. सकाळच्या शुभवेळी स्वामींच्या गीताचा गजर आणि नामस्मरणाचा उत्सव अनुभवण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

व्यवसायिक ऋषिकेश शशिकांत जाधव व श्वेता शशिकांत जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मातोश्री सिंधूताई सपकाळ संस्था शिरूर येथे वाढदिवसाच्या निमित्ताने खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. शशिकांत जाधव व अन्य मान्यवर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button