विशेष
शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -24) — वाणी के जादूगर प.पू. गुरुदेव श्री रमणीक मुनिजी म.सा. यांच्या ५९ व्या जन्मदिनानिमित्त तसेच महाराष्ट्र गौरव, खानदेश केसरी प.पू. श्री गौतम मुनिजी म.सा. (बरसादाता), तथा युवा प्रेरक प.पू. श्री चेतन मुनिजी म.सा. यांच्या चातुर्मासार्थ ॲक्टिव्ह सोशल ग्रुप, शिरूर यांच्या वतीने रक्तदान शिबिर, हिमोग्लोबिन तपासणी व मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती कामिनी प्रकाश बाफना यांनी दिली आहे .

शिरूर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे .

