विशेष

रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचे आयोजन — रांजणगाव पोलीस ठाण्याचा पुढाकार

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त रांजणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने ‘एकता दिन’ आणि ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी, तसेच विविध संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही मॅरेथॉन ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता सुरू होणार असून, प्रारंभ बिंदू उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, एसबीआय सर्कल, कारेगाव येथे असेल. स्पर्धेचे अंतर २ किमी, ३ किमी आणि ५ किमी असे ठेवण्यात आले असून, सहभागी स्पर्धकांना आपल्या सोयीनुसार कोणत्याही एक स्लॉटमध्ये धाव घेता येणार आहे.
मॅरेथॉन एसबीआय सर्कल, कारेगाव येथून सुरु होणार आहे.
या उपक्रमाद्वारे राष्ट्रीय एकतेचा संदेश देत समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन देशाच्या ऐक्याचा संकल्प दृढ करावा, असे पोलीस उपअधीक्षक   प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक  निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button