विशेष
बाबुरावनगर ते कारेगाव आणि वाघोली दरम्यान पीएमपीएमएल बससेवा ३ नोव्हेंबरपासून सुरू होणार
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने मागणी होत असलेल्या शिरूर शहरा लगत असणा-या बाबुराव नगर येथे सोमवार दिनांक ३ नोव्हेंबर पासून पीएमपीएमएल { पुणे महानगर परिवहन मंडळ } बससेवेचा नवीन मार्ग कारेगाव ते शिरूर (बाबूराव नगर ) असा सुरु होत आहे.


व त्यामुळे निर्माण झालेल्या वैद्यकीय सुविधा या सर्वानमुळे शिरूरची गावाकडून शहरा कडे वाटचाल सुरु झाली आहे. पुणे अहिल्यानगर महामार्गा वरील महत्वाचे शहर अशी शिरूरची ओळख निर्माण झाली आहे.

याबाबत माजी सनदी अधिकारी किशोरराजे निंबाळकर व प्रा. डॉ राजेराम घावटे यांनी पीएमपीएमएल कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार १५ दिवसापूर्वी पीएमपीएमएलच्या अधिकारी यांनी या परिसरात येऊन पाहणी केली होती. या पाहणी नंतर या मार्गावर बस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

