Uncategorizedराष्ट्रीयविशेष

शिरूरमध्ये शिवजयंती उत्सहात ; ‘धनराज नहार स्मृती व्याख्यानमाला’ २० ते २३ फेब्रुवारी पर्यत

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम, 24}‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिरूर शहरात उत्साहाचा महापूर उसळला. श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने नगरपरिषद मंगल कार्यालयात शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. माजी आमदार अशोक पवार, नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्ण, उपनगराध्यक्ष मितेश प्रदीप गादिया, माजी जि.प. सदस्य राहुल पाचर्णे, समिती अध्यक्ष रवींद्र धनक, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना रवींद्र धनक म्हणाले, “शिरूरमध्ये विविध संस्था, संघटना आणि सर्व धर्मीय नागरिक एकत्र येऊन गेली अनेक वर्षे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात. शिवजयंती निमित्त सामाजिक कार्यकर्ते स्व. धनराज नहार यांच्या स्मरणार्थ सुरू झालेल्या व्याख्यानमालेचे यंदा २९ वे वर्ष असल्याचे धनक यांनी सांगितले.

 

.”२० ते २३ फेब्रुवारीदरम्यान व्याख्यानमाला _

जीवन विकास मंदिर प्रांगण, कुकडी वसाहत (सिटीबोरा कॉलेज रोड) येथे दररोज सायं. ६.४५ वाजता व्याख्याने होणार आहेत.

२० फेब्रुवारी (शुक्रवार) : डॉ. वृषाली राऊत – ‘मानसिक धक्क्यातून सावरताना’

२१ फेब्रुवारी (शनिवार) : श्रुती पानसे – ‘पालकत्वाची कला व मेंदूशी मैत्री’

२२ फेब्रुवारी (रविवार) : डॉ. शंतनू जगदाळे – ‘तरुणाई आणि अमली पदार्थांचा विळखा’

२३ फेब्रुवारी (सोमवार) : प्राचार्य महासंघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार निकम – ‘छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना’

व्याख्यानमालेस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीने केले आहे.

दरम्यान  शिरूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच विविध संस्था संस्था, संघटना व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी गर्दी केली होती . शिवजयंती निमित्त परिसर भगव्या पताका झेंडे यांनी सजवण्यात आला होता.

गोलेगाव येथे ही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी वरून शिवज्योत आणण्यात आली.

बीकेसी स्कूल येथे शिवजयंती साजरी करताना

बीकेसी सेमी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिवजयंती जल्लोषात

मुक्ताईनगर येथील बीकेसी सेमी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्येही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्ष सुनील उर्फ दादा व सचिव सौ. मनीषा चौधरी यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली.

विद्यार्थी व पालकांच्या ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात वातावरण भारावले. ज्ञानेश्वरी वाखारे, तनुश्री पाचर्णे, प्रकृती वानखेडे, अनन्या पडवळ, अभिज्ञा शिंदे, प्रज्ञेश चव्हाण, रुद्र ढेंबरे, शिवराज आणि राजवीर सांगळे यांनी प्रभावी शिवगर्जना सादर केली.

शिवज्योतीचे स्वागत करताना पोलीस पाटील संदीप भोगावडे व वंदना भोगावडे

अर्णवी डोंगरे, वेदिका, शौर्या तांबे, सिद्धिक्षा बेलोटे, दृष्टी जासूद, राजवीर गायकवाड, उदय पोकळे, आर्यन डिकाव, कृष्णा ठाकूर, व्यंकटेश गव्हाणे, दूर्वा शेलार, आरुष सोनवणे, कियांश राक्षे, ओवी चौधरी आदी विद्यार्थ्यांनी गीत-नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

फुलांनी सजविलेल्या पाळण्यातून ‘बालराजे’ना सुमधुर पाळणा गीत गाऊन जोजवण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज, माँ जिजाऊ व मावळ्यांच्या वेशभूषेत सादरीकरण केले; तर महिला पालक व शिक्षिकांनी पारंपरिक पोशाख परिधान करून कार्यक्रमात रंगत आणली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button