विशेष

शिरूर मधील पांजरापोळ परिसरातील पिंजऱ्यात बिबट्या जे्रबंद

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शहरातील जोशीवाडी विठ्ठलनगर पांजरापोळ परिसरात मागील काही दिवसात बिबट्याचा वावर वाढल्याचा पार्श्वभूमीवर अलर्ट मोडवर आलेल्या वन खात्याने पांजरापोळ परिसरामध्ये तीन पिंजरे तसेच ट्रॅप कॅमेरे बसविले होते. या पिंजऱ्यांमध्ये आज सकाळी शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी बिबट्या जेरबंद झाला. हा बिबट्या नर असून अंदाजे वय तीन ते चार वर्ष असून बिबट्यास माणिक डोह डोह बिबट निवारण केंद्राकडे रवाना करण्यात आल्याचे तालुका वनाधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी सांगितले.दरम्यान तीन दिवसापूर्वी या परिसरात बिबट्याच्या वावर असल्याची माहिती मिळताच वन विभाग, शिरूर यांच्या वतीने तातडीने शोधमोहीम (सर्च ऑपरेशन) सुरू करण्यात आली होती. मानवी वस्ती असलेला परिसर, अरुंद बोळ्या आणि दाट घरे यामुळे बिबट्याचा ठावठिकाणा निश्चित करणे कठीण जात होते. मात्र, दीर्घ प्रयत्नांनंतर बिबट्याला हुसकावून नदीच्या दिशेने पाठवण्यात वन विभागाला यश आले होते.

त्यानंतर पांजरपोळ परिसरात तीन पिंजरे तसेच ट्रॅप कॅमेरे बसवण्यात येऊन ड्रोनच्या साहाय्याने परिसराची पाहणी करण्यात आली होती.

या शोधमोहीमेत वनपरीक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे, वनरक्षक गणेश झिरपे, वनरक्षक जालिंदर सानप यांच्यासह वनपरीक्षेत्रातील इतर कर्मचारी, बेस कॅम्प सदस्य तसेच माणिकडोह येथील डॉ. विसळकर आणि त्यांची टीम सहभागी झाली होती.

दरम्यान, नागरिकांना वन विभागाकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. बिबट दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा. विशेषतः संध्याकाळी व रात्रीच्या वेळी बाहेर पडताना सावधगिरी बाळगावी. लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी व त्यांना रात्री एकटे बाहेर सोडू नये. घरासमोर पुरेसा उजेड ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.काही महिन्यापूर्वी शिरूरच्या नदीकडच्या असणाऱ्या सूरज नगर परिसरातही बिबट्याचे दर्शन झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button