Uncategorizedविशेष

शिरूर नगरपरिषद निवडणुक १२ प्रभागासाठी ३६ मतदानकेंद्र

 शिरूर :

 दिनांक २ डिसेंबरला होत असलेल्या शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकी करीता १२ प्रभागांसाठी एकूण ३६ मतदान केंद्र असून २४ नगरसेवक निवडणून जाणार आहेत. एकूण मतदार ३२९९९३ असून त्यात पुरुष मतदार १६३०० तर स्त्री मतदार १६३९३ इतके असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित जगताप यांनी दिली.

 शिरूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर नगरपालिका येथे विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व माध्यमांचे प्रतिनिधी यांची बैठक झाली. यावेळी मुख्याधिकारी प्रीतम पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष संजय बारवकर, लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रविंद्र धनक, शिवसेनेचे शहर प्रमुख (ठाकरे ) संजय देशमुख, शिवसेनेचे शहरप्रमुख (शिंदे) मयूर थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शरद कालेवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष आदित्य मैड, आम  आदमी पक्षाचे शहराध्यक्ष अनिल डांगे, आरपीआयचे शहराध्यक्ष निलेश जाधव, आम्ही शिरुरकर फौंडेशनचे अध्यक्ष रवींद्र सानप, मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित आंबेकर,  भारतीय जनता पक्षाचे विजय नरके, उमेश शेळके तसेच वसंत बेंद्रे, सुभाष जैन, हाफिज बागवान, सोहेल शेख, अर्शद खान, बाळासाहेब आवारी, रवी लेंडे, आदी यावेळी उपस्थित होते.

जगताप यांनी सांगितले की २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून दिनांक ३ डिसेंबरला शिरूर नगरपरिषद नवीन इमारत येथील तळमजल्यावर मतमोजणी होणार आहे. पालिकेच्या तळ मजल्यावर स्ट्रोग रूम तयार करण्यात आली आहे. नगरपालिका कर्मचारी सह विविध शासकीय खात्यातील कर्मचारी, शिक्षक असे २५० निवडणूक कामासाठी असणार आहे. ही निवडणूक शांततेत व पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

  पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले म्हणाले की सर्वांनी कायदाचे पालन करावे. निवडणूक काळात नाकाबंदी, व कोम्बिंग ऑपरेशन करण्यात येईल. शिरूर पोलीस स्टेशन कडील १५ जणांवर तडीपारची कारवाई करण्यात आली असून दोन जणांवर एमपीडीची कारवाई करण्यात आली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार व निवडणुकीत बाधा आणणारे यांच्या विरोधात ही कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. प्रचार काळातील रॅली व सभे करीता आवश्यक त्या परवानग्या  घ्यावात असे ही ते म्हणाले.यावेळी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विविध सूचना केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button