Uncategorized
शिरूर नगरपरिषद उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवशी वार्ड क्रमांक ८ मधून प्रदीप बोरा यांचा उमेदवारी अर्ज दाखल. मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित आंबेकर उद्या गुरुवारी १३ नोव्हे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार

शिरूर : {डेली न्यूज पोस्ट टीम -24}शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज भरण्याचा तिसरा दिवशी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी अभिजित जगताप व मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली. 
आज वार्ड क्रमांक ८ ब मधून प्रदीप रमाकांत बोरा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.गुरुवार दिनांक १३ नोव्हे रोजी मातोश्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष व शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती व संपादक अभिजित आंबेकर हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख सोमवार दिनांक १७ नोव्हे २०२५ अशी आहे.मागील चार वर्षापासून रखडलेल्या नगरपरिषद निवडणूका लागल्या असून शिरूर नगरपरिषदेच्या सर्वात मोठा वार्ड हा वार्ड क्रमांक ३ असून त्याची मतदार संख्या ३८८१ इतकी आहे. त्यात २९१७ पुरुष मतदार आहेत तर १९६४ स्त्री मतदार आहेत.



