शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम- 24}पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबटयाच्या बंदोबस्त हायटेक पद्धतीने करण्यात येणार आहे. त्याच बरोबर पुणे जिल्ह्यातील बिबटया जेरबंद करण्या संदर्भात १२०० पिंजरे देण्यात येणार आहेत. त्यातील २०० पिंजरे देण्यात आले आहेत.बिबट निवारण केंद्रात २० बिबटे आहेत. गुजरात येथील वनतारांचे अधिकारी यांना हे बिबटे लवकर घेऊन जा असे सांगितले आहे. अन्य राज्यांना बिबटे लागत असतील तिथे ही बिबटे देण्यात येतील. आफ्रिकेत सिंह आहेत. त्याठिकाणी बिबटे नाहीत तेथे ही आपण बिबटे पाठवत असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. नरभक्षक बिबट्यास दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा सूचना देण्यात आले असल्याचे नाईक म्हणाले.
गेल्या अनेक दिवसापासून पिंपरखेड ग्रामस्थांनी वनमंत्री गणेश नाईक यांनी पिंपरखेड ला भेट द्यावी अशी मागणी लावून धरली होती .पिंपरखेड येथे बिबटयाने केलेल्या हल्ल्यात शिवन्या बोबे ही पाच वर्षाची कन्या व रोहन बोबे वय १३ व जाबूत येथील भागुबाई रंगनाथ जाधव या ज्येष्ठ महिलेच्या मृत्यू झालेल्या असून आता पर्यत शिरूर तालुक्यात १२ हुन अधिक जण बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावले आहेत.








