Uncategorized
मोटारसायकल अपघातात एक जण मृत्यूमुखी
शिरूर, {डेली न्यूज पोस्ट टीम -24}: शिरूर तालुक्यातील करडे गावच्या हद्दीत झालेल्या मोटारसायकल अपघातात प्रदिप गुलाब चव्हाण वय ३९ सध्या राहणार टेंभुर्णी (ता. माढा, जि. सोलापूर)मूळ रा. अहमदपूर, जि. लातूर)हे मृत्यूमुखी पडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. १२ नोव्हें.) पहाटे सुमारे ४.३०करडे च्या सुमारास करडे गावाजवळील आयएफबी कंपनीच्या वळणावर प्रदिप चव्हाण यांच्या युनिकॉर्न मोटारसायकलचा (क्रमांक एमएच २२ ई ए ३९५३) अपघात झाला. वाहनाचे नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात जाऊन पडली. यात गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती सकाळी अकराच्या सुमारास शिरूर पोलिसांनी त्यांच्या पत्नी उमा प्रदिप चव्हाण (वय २७, रा. टेंभुर्णी, मूळ रा. अहमदपूर, जि. लातूर) यांना दूरध्वनीवरून याची माहिती दिली. माहिती मिळताच उमा चव्हाण आपल्या नातेवाईकांसह न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्या.
अपघातस्थळी भेट दिल्यानंतर त्यांच्या मोटारसायकलचे समोरील भागाचे नुकसान झाल्याचे आढळले. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची (A.D.) नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार भोते करत आहेत.


