Uncategorizedराष्ट्रीय

आमचा गावचा परिसर बिबट मुक्त करा.

oplus_131074

शिरूर डेली न्यूज पोस्ट टीम 24}सगळेजण मला भेटायला येतात.. माझा रोहनच फक्त येत नाही.. माझा रोहन माझ्या डोळ्यासमोर बिबट्याने नेला..“माझा मुलगा खूप हुशार होता. शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवल होत शिकूनं  खूप मोठा होणार होता.बिबट्याच्या हल्ल्यात त्याचे प्राण गेले. सांगा माझा रोहन आता  परत येणार आहे का?” अश्या शब्दात रोहन बोबे यांचे वडील विलास बोबे यांनी  आपल्या भावना व्यक्त केल्याने घरातील सर्व सदस्यांसह उपस्थितांचे डोळे पाणावले दोन नोव्हेबर २०२५ रोजी बिबट्याने केलेला हल्ल्यात रोहित हा 13 वर्षाचा मुलगा मृत्युमुखी पडला.

डॉ. आखिलेश राजूरकर यांना डेली न्यूज पोस्ट टीमच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 रोहनच्या मृत्यूच्या अगोदर बिबटयाने  केलेल्या हल्ल्यात शिवन्या बोबे व जांबुत येथील भागाबाई जाधव या 85 वर्षे जेष्ठ महिलेला आपला प्राण गमवावा लागलेला आहे.

 रोहनच्या मृत्यूनंतर बिबट्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या शिरूर,आंबेगाव, जुन्नर खेड या भागातील लोकांनी जन आंदोलन करत रास्ता रोको केले व  हा सर्व भाग बिबट मुक्त करा व आम्हाला सुरक्षितपणे जगू द्या असे म्हणत टाहो फोडला.

वैद्यकीय व्यावसायिक डॉ. संदीप कोकरे यांना वाढदिवसाच्या डेली न्यूज पोस्ट टीमच्या वतीने हार्दिक शुभेच्छा
वैद्यकीय व्यावसायिक डॉ. संदीप कोकरे यांना वाढदिवसाच्या डेली न्यूज पोस्ट टीमच्या वतीने हार्दिक शुभेच्छा

 बिबट्याच्या हल्ल्यात एकापाठोपाठ तीन जणांच्या मृत्यूने  संतप्त झालेल्या नागरिकांच्या रागाचा कडेलोट झाला व त्यांनी वनखात्याच्या वाहनासह कार्यालयाची नासधुस व जाळपोळ केली. लोकांच्या आंदोलनाची दखल घेत शासकीय यंत्रणा गतिमान झाली  व या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्याबरोबरच इतर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.१२ बिबटे या परिसरातून जेरबंद करण्यात आले आहेत.तर एकानरभक्षक  बिबट्यास ठार मारण्यात आले आहे.
 रोहनच्या मृत्यूनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी  यांच्यासह वनमंत्री गणेश नाईक, माजी  मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यासह विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते व शासकीय अधिकारी यांनी बोबे  कुटुंबियायांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आहे.
 कौलाचे छत व शेणाने सारवलेली जमीन  असलेल्या या घरात वास्तव्य करणारे बोबे  कुटुंब हे एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे. सर्वसाधारण पालकाच्या  कुटुंबाची जशी अपेक्षा असते तशीच अपेक्षा रोहनची  आई  वैशाली उर्फ माधुरी आणि  वडिल विलास यांची   आपल्या मुलांविषयी होती.आपली दोन्ही मुले शिकून मोठे होतील व आपली परिस्थिती पालटवतील असे त्यांचे स्वप्न होते. परंतु दोन नोव्हेंबरला सारे होत्याचे नव्हते झाले. व रोहन बिबटयाच्या हल्ल्यात मरण पावला.
 बोबे  यांना दोन मुलं आहेत त्यांचा मोठा मुलगा ऋतिक  हा इयत्ता १० वीत तर मृत रोहन हा इयत्ता पाचवीच्या वर्गात होता. बोबे ज्या परिसरात राहतात तेथे  जाण्यासाठी व्यवस्थित असा रस्ता ही नाही आता रोहनच्या मृत्यू नंतर जाण्या-येण्याकरता रस्ता करण्यात आला आहे.बिबट्याच्या दहशतीत आणि भीतीत  या सर्व परिसरातील नागरिकांच्या  शेतकऱ्यांच्या  दिवसाची सुरुवात होते कुठून बिबट्या येईल आणि आपल्यावर हल्ला करेल याची भीती लहानग्यांपासून सर्वांनाच आहे.
 रोहनच्या मृत्यूनंतर रोहनच्या या छोट्या घरात व्हीआयपींचा राबता वाढला आहे. रोहन  चे वडील विलास यांच्याशी बोलताना त्यांना अश्रू अनावर होते माझा मुलगा खूप हुशार होता व शिष्यवृत्तीच्या परीक्षेत  त्याने उत्तम यश मिळवले शिकून फार मोठा होणार होता पण सारे काही उलटे झाले आज संपूर्ण राज्यातून  विविध लोक येतात पण मला सांगा ना माझा रोहन परत  येणार आहे का असा प्रश्न ज्यावेळेस ते  विचारतात त्यावेळेस उपस्थित सर्वांचे डोळे पाणवतात.
वनमंत्री नाईक यांनी रोहनच्या घरातील एकाला वनखात्यात नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे.
 रोहनचा मोठा भाऊ ऋतिक हा शाळेत इयत्ता १० वीला आहे. शाळेत  जाण्यासाठी  तो निघाला तेव्हा त्याला विचारले की तू शाळेत जातोय बिबट्याची भीती वाटत नाही का तो म्हटला बिबट्याची भीती वाटते पण शाळेत जावंच लागते.दररोज मला सोडायला कोणीतरी  मोटार सायकल वरून येत ते मला शाळेत सोडून मग घरी येतात.
 बिबट्या हा शेतकऱ्याच्या , शिवारात  अंगणात व थेट दारापर्यंत येऊन पोहोचला.तो एका रात्रीत नाही. अनेक महिने वर्ष त्याचे वास्तव्य या परिसरात वाढले. वेळीच जर याबाबत उपाययोजना झाल्या असत्या तर कदाचित या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात लोकांना मरण पत्कराव लागलं नसतं.
 बोबे  कुटुंबीयांना वन खात्याच्या वतीने गळ्यात घालण्यासाठी संरक्षक पट्टा देण्यात आले. या पट्टावर  प्लास्टिकचे टोकदार अणूकचिदार असे टोक आहेत गळ्याभोवती हा पट्टा घालून  शेतामध्ये वावरल्यास बिबट्याने जर चुकून हल्ला केला तर त्याच्यापासून संरक्षण होऊ शकते असे त्यांना सांगण्यात आले आहे.

 दररोजच आम्हाला शेतात जावं लागतं शेतात गेलं नाही तर आम्ही जगणार कसं.बिबट्याच्या भीतीने घरात बसून चालणार नाही. आम्हाला जगावच लागणार आहे असे सांगत ‘बिबट मुक्त परिसर ‘ हाच या परिसरातील दहशत व भीती दूर करणारा उपाय आहे.अन्यथा सायरन वाजवा, पिंजरे लावा, पट्टे गळ्यात घाला असे  कितीही उपाय गेले तरी बिबट्याच्या एका ठसाने व एका डरकाळीने पुन्हा भीती आणि दहशत निर्माण होतेच असे ग्रामस्थानच मत आहे.

वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर भाऊसाहेब पाचुंदकर यांना डेली न्यूज पोस्ट टीम च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button