राजकीय

शिरूर नगरपरिषद निवडणुक आज पाच जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

शिरूर नगरपरिषद निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज दाखल करताना अभिजीत आंबेकर
शिरूर नगरपरिषद निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करताना श्रीमती नंदा जाधव
शिरूर नगरपरिषद निवडणुक करिता उमेदवारी अर्ज दाखल करताना महेंद्र बोरा

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज भरण्याचा चौथ्या दिवशी पाचजणांनी उमेदवारी अर्ज दाखल अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी अभिजित जगताप व मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली.

आता पर्यत एकूण ६ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून नगराध्यक्षपदासाठी एक ही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.

काल वार्ड क्रमांक ८ ब मधून प्रदीप रमाकांत बोरा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी ही आज पुन्हा उमदेवारी अर्ज दाखल केला.

मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती पत्रकार अभिजित आंबेकर यांनी वार्ड क्रमांक १२ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्याच्या समवेत काँग्रेस आय चे शहराध्यक्ष किरण आंबेकर, शिरूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष प्रवीण मुथा, हुडको कृति समिती शिरूर चे शैलेश जाधव,तेजस आंबेकर आदी उपस्थित होते.

वार्ड क्रमांक ११ मधून नंदा जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. वार्ड क्रमांक ४ ब मधून किराणा व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बोरा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वार्ड क्रमांक ६ मधून गणेश शिवराम पाचर्णे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख सोमवार दिनांक १७ नोव्हे २०२५ अशी आहे.मागील चार वर्षापासून रखडलेल्या नगरपरिषद निवडणूका लागल्या असून शिरूर नगरपरिषदेच्या सर्वात मोठा वार्ड हा वार्ड क्रमांक ३ असून त्याची मतदार संख्या ३८८१ इतकी आहे. स्त्री मतदार – १९६४ पुरुष मतदार -१९१७ एकूण मतदार – ३८८१

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button