Uncategorized
शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम -24}: शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज भरण्याचा सहाव्या दिवशी १२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी अभिजित जगताप व मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली.
आता पर्यत एकूण २१ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून नगराध्यक्षपदासाठी एक ही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, माजी नगरसेवक विनोद भालेराव, भाजपा चे माजी शहराध्यक्ष केशव लोखंडे, मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे, स्वप्ननील माळवे, शिवसेनेच्या सुप्रिया साकोरे, या प्रमुख उमदेवारी अर्ज दाखल केले आहेत.


