Uncategorized

हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मृति दिनानिमित्त रविवार 16 नोव्हेंबर रोजी व्याख्यानाचे आयोजन

 

 

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम -24}शिरूर नगरपरिषद, शिरूर रिक्रिएशन क्लब अँड लायब्ररी संचलित मुक्तद्वार वाचनालय तसेच चांदमल ताराचंद बोरा़ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवार, १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता “भारतीय स्वातंत्रलढ्यातील क्रांतिवीर विष्णू गणेश पिंगळे यांचे योगदान”या विषयावर चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील इतिहास व प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभाग चे प्रा. डॉ . अंबादास केत यांचे व्याख्यान शिरूर नगरपरिषदेचे ग्रंथालय इमारत, रामआळी, शिरूर येथे होणार आहे.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुभाष प्रतापराव पवार असणार आहेत. आयोजन समितीत रविंद्र धनक, मुहम्मद हुसेन पटेल, सौ. कल्पना काकडे (ग्रंथपाल) आणि डॉ. दीपक गायखवाड व प्रा. सतीश धुमाळ यांचा समावेश आहे.या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानामुळे हुतात्मा पिंगळे यांच्या क्रांतिकारी कार्याची नव्याने उजळणी होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button