क्राईम

युवकाकडून एका पिस्तूलासह तीन जिवंत काडतूसे पोलिसांनी केली जप्त

  1. शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम -24} वडगाव रासाई (ता. शिरूर, जि. पुणे) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रेया मेडिकलसमोर एका  युवका कडून  गावठी पिस्तुलसह तीन जिवंत काडतूसे पोलिसांनी जप्त केली आहे.

याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती की वडगाव रासाई येथे एक युवक पिस्तूल घेऊन फिरत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी तत्काळ पथक तयार करून कारवाई केली.

पोलीस सब इन्स्पेक्टर  रमेश कदम यांच्या नेतृत्वाखाली पो.हवा. शिंदे (ब.नं. 2463), पो.कॉ. वाघ (ब.नं.1428), पो.अ. टेंगले (ब.नं.1722) तसेच पंचांसह पथकाने संशयित ठिकाणी तत्परतेने धाव घेतली. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांना एका इसमावर संशय आला. पोलीसांना पाहताच तो पळण्याचा प्रयत्न करीत असताना तोल जाऊन तो खाली पडला आणि त्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे नाव भाऊ उर्फ पांडुरंग मोहन गायकवाड (वय 25, रा. वडगाव रासाई) असे समोर आले. पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी बनावटीचे पिस्तुल आढळले. पिस्तुलातील मॅगझिन उघडून पाहिल्यावर पिवळ्या रंगाची तीन जिवंत काडतुसे मिळाली.

हत्याराबाबत परवान्याची विचारणा केली असता संबंधित व्यक्तीकडे कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button