निधन वृत्तराष्ट्रीय

महासती जी प. पू .श्री डॉ.प्रियदर्शनाजी म सा यांच्या संथाराव्रताची पूर्णाहूती . अंतिमयात्रा शुक्रवार दिनांक २३ मे रोजी मयूर कॉलनी कोथरुड पुणे येथून निघणार

शिरुर दिनांक( डेली न्यूज पोस्ट टीम )
कोथरुड पुणे येथे संथाराव्रत धारण केलेल्या महासती जी प. पू .श्री डॉ.प्रियदर्शनाजी म सा ( वय -८६ ) यांचे संथाराव्रताची आज ( २२ मे ) रोजी ६८ व्या दिवशी पुर्णाहूती झाली .
डॉ .प्रियदर्शनाजी या शिरुर घोडनदीच्या चोपडा परिवारातील होत्या. त्याच्या आईचे नाव प्यारीबाई चोपडा तर वडिलांचे नाव चांदमल चोपड़ा होते .
बंधू संपतलाल चोपड़ा होत तर मामा
मामा जवानमल संघवी , चुनिलाल संघवी , मोहनलाल संघवी व उत्तमचंद संघवी होत .गुरु आनंदऋषिजी म. सा.तर गुरुणी उज्ज्वलकुमारी जी म. सा. होते.
डॉ. प्रियदर्शनाजी यांच्या जन्म ३० नोव्हेंबर १९३९ रोजी घोडनदी , शिरुर येथे झाला .त्यांचे शिक्षण एम ए . पीएच डी व डी . लिट चे शिक्षण असे झाले होते . पीएच. डी चा अभ्यास विषय ‘ जैन साधना पध्दती में ध्यान योग ‘ हा होता . तर डी. लिट .साठी ‘ णमो सिध्दाणं ,नवकार महामंत्र ‘ हा विषय अभ्यासासाठी होता . त्यांनी महाराष्ट्र ,आंध्रप्रदेश , तामिळनाडू , मध्यप्रदेश ,कर्नाटक या राज्यात विहार पदयात्रा केली होती . वात्सलय व करुणा व सर्वसामान्या विषयी कणव त्यांना होती . २७ नोव्हेंबर १९६१ ला त्यांनी जळगाव येथे दीक्षा घेतली . तर १६ मार्च २०२५ रोजी कोथरुड पुणे येथे त्यांनी संथारा व्रत धारण केले होते या काळात त्याच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत होते . ६८ व्या दिवशी त्यांच्या संथाराव्रताची पूर्णाहूती झाली .
डॉ . प्रियदर्शनाजी महाराज साहब यांच्या घोडनदी मध्ये सन -१९८८ व सन २००१ मध्ये  चातुर्मास झाला होता
अंतिमयात्रा  – शुक्रवार दिनांक २३ मे रोजी सकाळी ९ वाजता कोथरुड श्री . वर्धमान सांस्कृतिक प्रतिष्ठान , मयूर कॉलनी , कोथरुड येथून निघेल .
             चौकट
जैन युवा परिषदेचे प्रकाश चंद्रकांत बाफना यांनी सांगितले की डॉ . प्रियदर्शनाजी महाराज यांनी सातत्याने नवकार महामंत्राची साधना केली . नवकार महामंत्राची एकूण शब्द संख्या ६८ इतकी असून डॉ . प्रियदर्शनाजी महाराज यांच्या संथाराची पूर्णाहूती ही ६८ व्या दिवशी झाल्याचा योगायोग घडल्याचे बाफना यांनी सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button