शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}कोणी किती ही मोठा असू दे,कायदा हातात घेण्याचा कोणी प्रयत्न केला. व डिग डॉंग केले तर त्याला सोडणार नाही दहशत व दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा देत कायदा व सुव्यवस्था चांगली पाहिजे असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शिरूर येथे म्हणाले.
शिरूर नगरपरिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस च्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या अभिजित पाचर्णे व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जाहीर सभा शिरूर मधील पाच कंदील चौकात झाली.
यावेळी आमदार माऊली कटके, माजी मंत्री दिलिप वळसे पाटील, म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवि काळे, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे, आदी उपस्थित होते.

पवार यावेळी म्हणाले की आम्ही सर्वधर्मसमभाव नुसार काम करतो. .जातीपातीचे राजकरण करीत नाही. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधान बदलणार,राखीव जाणार असे फेक नेरिटिव्ह पसरविले त्यामुळे ४८ पैकी १७ जागा लोकसभा निवडणुकीला आल्या. 

शिरूर नगरपरिषदेत आम्ही उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या शिरूर शहर विकास आघाडी बरोबर निवडणुकीस सामोरे जायचो. मी यात कधी ही हस्तक्षेप केला नाही. काही जण चुकीचे सांगतात की आघाडी मध्ये अजित पवार यांनी जादा जागा राष्ट्रवादीला मागितल्या. प्रकाश धारिवाल यांनी मला स्पष्ट पणे सांगितले होते की माझ्या व्यवसायामुळे मी निवडणुकीत नसणार आहे.


शिरूर नगरपरिषद नवीन इमारती साठी निधी उपलबद्ध करून दिला. शिरूरची बाजारपेठ चांगली असली पाहिजे असे पवार म्हणाले.
कायदा व सुव्यवस्था चांगली पाहिजे. कोणी ही जर कायदा हाती घेण्याचा प्रयत्न केला. डिंग डॉंग करत असेल तर त्याला सोडणार नाही तो कोणीही मोठ्या बापाचा असो आमच्या जवळचा असो अथवा लांबचा असो त्याला सोडणार नाही. आमच्या कडे सगळ्यांना न्याय समान असणार असल्याचा इशारा देत दहशत खपवून घेतली जाणार नाही असे पवार म्हणाले.



शिव शाहू फुले व आंबेडकर यांचे विचार पुढे घेवून आम्ही जात आहोत.सर्वसामान्याच्या उत्कर्षा साठी शासन काम करीत आहे. महिलांसाठी विविध योजना शासनाने आणल्या आहेत. शिरूर शहर हे मोठ्या झपाट्याने वाढत आहे. शिरूर शहरा लगत सुपा, कारेगाव, कर्डे,रांजणगाव असा चार औद्योगिक वसाहती वेगाने विस्तारत आहे. शिरूर शहर हे वाढत आहे. वाढत्या शहरीकरणाचा वेग लक्षात घेता शहराचा नियोजनबद्ध विकास होणे गरजेचे आहे.

शिरूर शहराचा कचराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जी काही मदत लागेल ती देण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर शिरूर शहर हे शैक्षणिक केंद्र कसे बनेल या दृष्टीने काम करु असे ते म्हणाले. पुणे नाशिक रेल्वे इकडून न्यायची आहे त्या बाबत सर्वे सुरु झाला आहे. अहिल्यानगर ते पुणे या रस्त्याचे काम सुरु होत आहे. असे पवार यांनी सांगितल.

क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचे ही आश्वासन त्यानी दिले. शिरूर शहराचा हद्दी वाढीचा पश्न सर्वांना विश्वासात घेवून निकाली काढण्यात येईल असे ही पवार म्हणाले.

नवीन आव्हाने येतील तसे आपणांस बदलावे लागेत असे सांगून कृत्रिम बुद्धिमत्तेचे नवीन तंत्रज्ञान शेतीसाठी आणले आहे.
पुणे अहिल्यानगर नाशिक जिल्ह्यात बिबट्याच्या प्रश्न निर्माण झालेला आहे. मानव बिबट संघर्षावर तातडीने उपयायोजना काम करण्यात येत असून रेसक्यू टीम व अत्याधुनिक साधनासाठी ११ कोटी रुपयेच निधी देण्यात आला असून नागरिकांनी भयभीत होवू नये व प्रशासनाने दिलेल्या सूचनाचे पालन करावे असे ही आवाहन पवार यांनी केले.


राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा केंद्रात व राज्यात महायुती म्हणून सत्तेत असून काम करून घेण्याची क्षमता आमच्यात असून त्याच्यातून विकास करणार असल्याचे सांगून प्रथमच राष्ट्रवादी कॉंग्रेस शिरूर मध्ये पक्षावर निवडणूक लढवीत असून उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यानी केले. 

आमदार माउली कटके म्हणाले की शिरूर शहर हे पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य शहर बनविण्याचा ध्यास असून शासनाने शहरातील भुयारी गटार योजने सह पाणी पुरवठा योजनेसाठी निधी दिला आहे. शिरूर शहराचा हद्दीवाढीचा प्रश्न ही मार्गी लावण्यात येईल असे कटके म्हणाले.
म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव म्हणाले की विद्यमान खासदाराने शिरूर साठी किती कोटी रुपये च्या विकास निधी दिला. मी माजी खासदार असूनही ८० कोटी र हून अधिक रुपयेचा निधी विकास कामासाठी दिला.विविध समाजासाठी निधी दिल्या. शिरूर शहरात विकासकामे करण्याची धमक आमदार कटके यांच्यात आहे. शिरूर शहराला स्मार्ट सिटी करायची आहे असे ही ते म्हणाले.

नगराध्यक्षपदाचा उमेदवार ऐश्वर्या पाचर्णे म्हणाल्या की शिरूरला नवे रूप व दिशा देण्याची वेळ आली असून बहुसंख्य मताने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
सभेत्त माजी नगरसेवक विठ्ठल पवार, अभिजित पाचर्णे, शिवाजी कु-हाडे, निलेश लंटाबळे, विनोद भालेराव, मोसिन पठान, अविनाश घोगरे, सागर सातारकर यांनी राष्ट्र्वादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. 

