राष्ट्रीय

शिरूर शहराच्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना दवारे सर्वांगीण विकास करणार : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}:  शिरूर शहराचा सर्वांगीण विकास केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांद्वारे करण्यात येईल, तसेच शिरूर शहराचा सर्व्हे करून प्रॉपर्टी कार्ड वाटपाची प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

शिरूर नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने उभ्या असणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बावनकुळे शिरूर शहरात आले होते.

प्रा. विलास आंबेकर यांना वाढदिवसाच्या डेली न्यूज पोस्ट टीम 24 च्या वतीने हार्दिक शुभेच्छा

 शहरातील बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की हुडको कॉलनी संदर्भातील वर्ग दोनची प्रॉपर्टी वर्ग एक ची करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. हुडको कॉलनीचे पुढील काही महिन्यात प्रॉपर्टी कार्ड करण्याचा निर्णय होईल असे सांगून गुजर मळ्यातील खेळाच्या मैदानाचा असलेल्या आरक्षणा संदर्भातील प्रश्न मार्गी लावण्यात येईल.

शिरूर कापड असोसिएशनचे अध्यक्ष सिद्धेश्वर बगाडे यांना डेली न्यूज पोस्ट टीम यांच्यावतीने भावपूर्ण आदरांजली

स्टेट बँक कॉलनी शिरूर येथील खेळाच्या मैदानाच्या आरक्षणासंदर्भातला प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली. शिरूर

 नगरपालिकेची सत्ता भाजपा कडे आल्यास शिरूर शहराचे विविध प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे सांगून भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा लोळगे व नगरसेवक पदाच्या उमेदवाराना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी आमदार महेश लांडगे, पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष प्रदीप कंद जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पलांडे, भाजप तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे, धर्मेंद्र खांडरे, जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष संजय बारवकर, भाजप शहराध्यक्ष नितीन पाचर्णे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा राजेंद्र लोळगे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button