Uncategorized
नगराध्यक्ष पदाकरता भाजपाच्या कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती.परंतु नगराध्यक्ष पदासंदर्भात अडचणी निर्माण झाल्याने महायुती ऐवजीभाजपा स्वतंत्र पालिकेची निवडणूक लढवत आहे : प्रदीप कंद

शिरुर दिनांक {डेली न्यूज पोस्ट टीम 24}भाजपाने शिरूर लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काम प्रामाणिकपणे केले. शिरूर नगरपालिका निवडणूक युतीचा माध्यमातून लढविण्याच्या प्रस्ताव होता. भाजपचा कार्यकर्त्यांची मागणी होती की लोकसभा व विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे भाजपाने राष्ट्रवादीचे काम केले असून नगराध्यक्षपद हे भाजपाला देण्यात यावे. पण या प्रस्तावाबाबत अडचणी आल्याने
महायुती ऐवजी भाजपा स्वतंत्रपणे पालिकेची निवडणूक लढवित असून भाजपा उमेदवार यांच्या प्रचारासाठी महसूल मंत्री चन्द्रशेखर बावनकुळे हे मंगळवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी शहरात पदयात्रा काढणार असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले. 
यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे, पक्षाचे निवडणूक निरीक्षक संदीप भोंडवे, भाजपचे संघटक धर्मेंद्र खांडरे,


माजी तालुकाध्यक्ष भगवान शेळके, माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, माउली साकोरे, प्रवीण मुथ्था , ललित नहार, विजय नरके, राजू शेख, अजित डोंगरे, निलेश नवले आदी उपस्थित होते.

कंद म्हणाले की शिरूर शहराला वैभवशाली इतिहास आहे. उद्योगपती रसिकलाल धारिवाल, शहीदखान पठाण, आमदार बाबुराव पाचर्णे यांनी शिरूर शहराचा सर्वागीण विकास करण्यासाठी काम केले. देशात व राज्यात भाजपाचे शासन असून शिरूर शहरात ही भाजपची सत्ता आल्यावर शहराचा चेह्र्रामोह्र्रा विकास कामाचा माध्यमातून बदलून टाकण्यात येईल.शिरूर शहराचा विकासा करीता भाजपा कटीबध्द आहे. शहरातील रस्त्यांच्या प्रश्नासह क्रीडासंकुल, उद्याने, नाट्यगृहे, अभ्यासिका असे विविध प्रश्न भाजपा सत्तेत आल्यावर मार्गी लावण्याचा दृष्टीने काम करेल असे कंद म्हणाले. 
जयश्री पलांडे म्हणाल्या की केंद्र व राज्य शासन यांच्या माध्यमातून शिरूर नगरपरिषदला विकास कामासाठी मोठ्या निधी उपलब्ध होवू शकतो. भाजपाच्या उमेदवार सुवर्णा लोळगे यांना नगराध्यक्षपदी निवडणून द्यावे असे आवाहन त्यानी केले. 
धर्मेंद्र खांडरे म्हणाले की शहराची वाढ होत असतांना पार्किंगची मोठी समस्या निर्माण झालेली असून ही समस्या सोडविण्यासाठी उपाय करण्यात येतील त्याच बरोबर नदी सुधार जॉगिग ट्रक या बाबत ही काम करण्यात येईल.

