विशेष
पालिका निवडणुक प्रचार सोमवार दिनांक १ डिसेंबर पर्यत करता येणार – निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित जगताप
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}शिरूर नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी दिनांक ३ डिसेंबर रोजी होणार असून संपूर्ण मतमोजणी दोन ते तीन तासात पूर्ण होऊन निकाल जाहीर होईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित जगताप यांनी दिली.
.जगताप यांनी सांगितले की निवडणुक आयोगाने दिलेल्या नव्या निर्दशानुसार निवडणुकीचा जाहीर प्रचार सोमवार दिनांक १ डिसेंबर पर्यत असणार आहे. 
मतमोजणी बुधवार दिनांक ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शिरूर नगरपरिषद नवीन इमारतीत होणार आहे . ३६ मतदान केंद्रा वरील मतमोजणी होणार आहे. १२ टेबल वर प्रभाग निहाय मतमोजणी होणार आहे त्याच वेळी नगराध्यक्षपदाची ही मतमोजणी होणार आहे.
१८००२३३२१२३ या टोल फ्री क्रमांकवर तक्रार अथवा सूचना करू शकता असे जगताप यांनी सांगितले.
निवडणूक संदर्भात दोन वेळा कर्मचारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक प्रचारासाठी उमेदवारा कडून फलक लावले जातात असे फलक लावताना पालिकेकडून परवानगी घ्यावे लागते व शुल्क भरावे लागते. शहरात ५२७ फलक लावण्यात आले असून त्यापोटी पालिकेस ४ लाख ७० हजार रु शुल्क प्राप्त झाले आहे.
त्याच बरोबर निवडणुक अर्ज भरण्याचा काळावधीत ४४ लाख ९६ हजार रुपयेचा टक्स वसुल करण्यात आल्याचे जगताप यांनी सांगितले.मतमोजणी करिता १०० कर्मचारी तर मतदानाच्या दिवशी १९० कर्मचारी असणार आहे.
-
यावेळी कार्यालयीन अधीक्षक राहुल पिसाळ उपस्थित होते.
