Uncategorized

आर.एम. धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर येथे आंतरशालेय सांस्कृतिक महोत्सव उत्साहात 

शिरूर :{डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित आंतरशालेय सांस्कृतिक महोत्सव नुकत्याच शालेय सभागृहात उत्साहात पार पडला.शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या एकूण 11 शाखांनी यात सहभाग घेतला.वय वर्ष 4 ते वय वर्ष 25 अशा विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी या महोत्सवात व त्यानिमित्ताने झालेल्या स्पर्धा मध्ये सहभाग घेतला.

         कार्यक्रमाचे उदघाट्न शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांन मधील नृत्य, गायन, वादन, अभिनय अश्या विविध कला गुणांना वाव मिळण्यासाठी हा सांस्कृतिक महोत्सव महत्वाचा आहे. संस्थेचे अध्यक्ष धरमचंद फुलफगर म्हणाले की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरता विविध उपक्रमांच्या आयोजन सातत्याने करण्यात येईल.

मुख्याध्यापिका अश्विनी घारू यावेळी म्हणाल्या की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय समोर ठेवून संस्था सतत कार्यरत असते संस्थेचे सचिव नंदकुमार निकम यांच्या संकल्पनेतून या वर्षीपासूनच सांस्कृतिक महोत्सव करण्यात आला आहे.

 या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे

पूर्व प्राथमिक विभाग-

प्रथम क्रमांक :- आर. एम. धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर

द्वितीय क्रमांक-विद्याधाम प्राथमिक शाळा शिरूर.

प्राथमिक विभाग( इयत्ता १ली ते इयत्ता ४ थी)

प्रथम क्रमांक-विद्याधाम प्राथमिक शाळा

द्वितीय क्रमांक-आर.एम.धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल

प्राथमिक विभाग( इयत्ता ५वी ते ७वी)

प्रथम क्रमांक ( विभागून )

– आर. एम. धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल आणि विद्याधाम प्रशाला शिक्रापूर

द्वितीय क्रमांक-

 – मंगलमूर्ती विद्याधाम, रांजणगाव

तृतीय क्रमांक-

– श्री.संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशाला,देवदैठण

उत्कृष्ट सादरीकरण:-

 -प्रभू विद्याधाम प्रशाला,वाडेगव्हाण

माध्यमिक विभाग-

प्रथम क्रमांक( विभागून )-

 – विद्याधाम प्रशाला,शिरूर

आणि श्री भैरवनाथ विद्याधाम,लोणी

द्वितीय क्रमांक ( विभागून )-

 – आर. एम. धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल आणि डॉ. बसू विद्याधाम,लोणीकंद

तृतीय क्रमांक ( विभागून )-

 – श्री संत श्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशाला,देवदैठण आणि

 श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशाला, मांडवगण फराटा.

महाविद्यालय-

प्रथम क्रमांक-

 – चांदमल ताराचंद बोरा कनिष्ठ महाविद्यालय

द्वितीय क्रमांक( विभागून )

 – विद्याधाम कनिष्ठ महाविद्यालय, शिक्रापूर आणि विद्याधाम कनिष्ठ महाविद्यालय, शिरूर.

उत्कृष्ट सादरीकरण:-

 – चांदमल ताराचंद बोरा वरिष्ठ महाविद्यालय

या स्पर्धेचे परीक्षण दूरदर्शन व सोनी टीव्ही प्रसिद्ध कलाकार घनश्याम सोनावळे व सौ नीता सतीजा यांनी केले

सतीश शांतीलाल बोरा यांना डेली न्यूज पोस्ट टीमच्या वतीने विनम्र अभिवादन.

  सर्व विजेत्या शाळांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष धरमचंद फुलफगर,सचिव नंदकुमार निकम, चां. ता. बोरा महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते,आर. एम. धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल चे अध्यक्ष शिरीष बरमेचा संस्थेचे सदस्य चंदूलाल चोरडिया, प्रकाश बाफना,शिरीष गदिया, राजेंद्र दुगड, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी देशपांडे, विद्याधाम प्रशालेचे मुख्याध्यापक गुरुदत्त पाचरणे, विद्याधाम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती मुळे यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button