Uncategorized

चोरीला गेलेल्या ट्रक्टर व काकरपाळी यंत्र पोलीसांनी केले हस्तगत . दोन आरोपीना अटक

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा उघडकीस आणून दोन आरोपींना  पोलीसांनी जेरबंद करत चोरीस गेलेला ट्रॅक्टर व काकरीपाळी यंत्र असा एकूण दोन लाख रू. किंमतीचा मुद्देमाल  स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलीसांनी हस्तगत केला आहे . याप्रकरणी १) समीर बापू कुंजीर वय २१ वर्षे, २) निखील दत्तात्रय ठाकर, वय २२ वर्षे दोघे रा. टाकळी भिमा, ता. दौंड जि पुणे यांना अटक करण्यात आली आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत निलेश प्रकाश कोरेकर, वय ४० वर्षे रा. न्हावरे ता. शिरूर जि पुणे यांनी त्यांचे घरासमोरील ट्रक्टर व  काकरी पाळी यंत्र चोरट्याने चोरून नेले असल्याची फिर्याद पोलीस स्टेशनला दिली होती
सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने समांतर रित्या सुरू करणेत आला होता, तपासा दरम्यान सी.सी.टी.व्ही. फूटेज तपासणेत आले, चोरटयांनी ट्रॅक्टर चोरी करून न्हावरा रोडने करडे, रांजणगाव, निमगाव म्हाळुंगी मार्गे पुन्हा न्हावरा-शिक्रापूर रोडला ट्रॅक्टर आल्याचे आढळून आले होते . पुढे सी.सी.टी.व्ही.चा अभाव असल्याने ट्रॅक्टरचा माग काढण्यास पथकाला अडचणी येवू लागल्या, तांत्रिक विश्लेषणाचा आधार व गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळवून सदरचा गुन्हा हा  समीर बापू कुंजीर रा. टाकळी भिमा ता. दौंड, जि पुणे याने त्याचे साथीदारासह केला असून त्यांचेजवळ न्यू हॉलंड कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर आहे अशी बातमी तपास पथकाला मिळाली . त्या आधारे संशयिताचा शोध घेत असताना स्था.गु.शा.चे पथकाने आरोपी  १) समीर बापू कुंजीर वय २१ वर्षे, २) निखील दत्तात्रय ठाकर, वय २२ वर्षे दोघे रा. टाकळी भिमा, ता. दौंड जि पुणे यांना बाबुराव नगर, शिरूर येथून ट्रॅक्टर सह ताब्यात घेतले, त्यांचेकडून गुन्हयात चोरी गेलेला न्यु हॉलंड कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर व काकरी पाळीचे यंत्र असा एकूण दोन लाख रु . किमंतीचा  मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे.
आरोपीना   न्यायालयासमक्ष हजर केले असता, न्यायालयाने आरोपीना न्यायालयीन कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.
हा तपास  पोलीस अधीक्षक   पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक  रमेश चोपडे  उपविभागीय पोलीस अधिकारी  प्रशांत ढोले  यांचे मार्गदर्शनाखालो स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजु मोमीन, सागर धुमाळ यांनी केला .¯

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button