Uncategorized

खासदार डॉ.अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली शिरूरमध्ये महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन;नगराध्यक्षपदाचा उमेदवार अलका खांडरे व नगरसेवक पदाचे उमेदवार यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम -24}राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार  पक्ष आणि  महाविकास आघाडीच्या वतीने आज शिरूर शहरात काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने निवडणूक वातावरण अधिक तापवले. शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.   शिरूर नगरपरिषद निवडणुकीत  महाविकास आघाडीचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. अलका सुरेश खांडरे व नगरसेवकपदाचा उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात झाली. यावेळी माजी आमदार अशोक पवार, नगराध्यक्ष पदाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अलका सुरेश खांडरे, माजी नगराध्यक्ष गुलाब धाडीवाल, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे,माजी नगरसेवक संतोष भंडारी, अबिद शेख यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.रॅलीदरम्यान नागरिकांशी संवाद साधत अलका खांडरे यांना नगराध्यक्षा पदासाठी आणि आघाडीच्या सर्व नगरसेवक उमेदवारांना मतदान करून विजय मिळवून देण्याचे आवाहन करण्यात आले. शिरूर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी केलेल्या विकासकामांची माहितीही मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आली.शहरातील मुख्य बाजारपेठ  कापड बाजार राम आळी, मारूती आळी, हलवाई चौक, सुभाष चौक, मुंबई बाजार, यशवंतराव चव्हाण चौक, कुंभार आळी सह आणि विविध भागांतून मार्गक्रमण करताना रॅलीने वातावरणात जल्लोष, घोषणाबाजी आणि निवडणूक उत्साहाची लाट निर्माण केली. नगरीत आज दिवसभर या रॅलीची जोरदार चर्चा सुरू होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button