Uncategorizedराष्ट्रीयविशेष
शिरूर तीन बिबटे जे्रबंद
शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम -24}शिरूर तालुक्यात काही दिवसापासून बिबटयाने उच्छाद मांडला असून आज पहाटे रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील फियाट कंपनीचा आवारात लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबटया जे्रबंद झाला तर रावडेवाडी व पिंपरखेड येथील पिंजऱ्यात एक असे एकूण तीन बिबटे जे्रबंद करण्यात वनखात्याला यश मिळाले असल्याची माहिती तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली.
काल रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील फियाट कंपनीत बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आल्यावर मोठी खळबळ उडाली होती.कंपनीत बिबटया आढळून आल्याचे कळाल्यावर वनखात्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत कंपनीच्या आवारात बिबटयास जे्रबंद करण्यासाठी पिंजरे लावले होते. आज पहाटे त्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. त्याचे वय अंदाजे 3 ते 4 वर्षाचे आहे. सदर बिबट्या माणिकडोह निवारा केंद्र येथे पाठविण्यात आला आहे.
रावडेवाडी (कवठे येमाई जवळ) अंदाजे 3ते 4 वर्षे वयाची मादी बिबट जेरबंद झाली. त्याच बरोबर पिंपरखेड येथे ही अंदाजे 5 वर्षे वयाचा नर बिबट जेरबंद करण्यात आला असून दोन्ही बिबटयाना माणिकडोह निवारण केंद्र येथे पाठविण्यात येत असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले.



