विशेष
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}फाकटे, ता. शिरूर येथे विहिरीत पडलेल्या बिबट्यास सुखरूपपणे बाहेर काढून त्यास जीवदान देण्यात वनविभागास यश आले आहे.
फाकटे गाव मध्ये आज सकाळी ( बुधवार ३ डिसेंबर) रोजी पहाटे बिबट्या विहिरीमध्ये पडला होता. नवनाथ दत्तू शेलार हे शेतकरी मोटर चालू करायला गेले असता त्यांच्या निदर्शनास बिबटया विहिरीत पडल्याचे आढळून आले. त्यांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्ते शंकर पिंगळे यांना फोनवरून माहिती दिली.शंकर पिंगळे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे व वनरक्षक केसकर यांना फोन करून संबंधित घटनेची माहिती दिली.
त्यानंतर तात्काळ रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली व विहिरीत पडलेल्या बिबट्या तात्काळ रेस्क्यू करून माणिक डोह येथे पाठवून देण्यात आला.अशी माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली.


