Uncategorizedविशेष

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी डेक्कन एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल कटिबद्ध ; संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे

डेक्कन एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्सहात संपन्न

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम – 24}मुलांमधील नेतृत्वगुण वाढीसह सर्वागिण विकासासाठी डेक्कन एज्युकेशन इंग्लिश मिडीयम स्कुल शिरूरच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगून भारत देशाची विश्वगुरु कडे वाटचाल सुरु असल्याचे डेक्कन एजयुकेशन सोसायटी चे उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे म्हणाले.

डेक्कन एजयुकेशन इंग्लिश मिडीयम स्कुल शिरूरच्या वार्षिक स्नेहसमेंलन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणूनp ते बोलत होते . यावेळी संस्थेचे पदाधिकारी डॉ.शरद आगरखेडकर,डॉ. रवींद्र आचार्य, डॉ. सविता केळकर यांच्या सह स्कुलचे प्राचार्य डॉ. समीर ओंकार, प्राचार्य नीरज रॉय, विनायक म्हसवडे, भाजपचे माजी शहाराध्यक्ष ललित नहार, पालक संघाचे उपाध्यक्ष महादेव भटकर आदी उपस्थित होते.

पलांडे म्हणाले शिरूर येथिल डेक्कन स्कुलचे नाव सर्वदूर पोहचत आहे. पालकाच्या साथीने विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकाससाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे ते म्हणाले.

डॉ. आगरखेडकर म्हणाले की भारतीय ज्ञान परंपरा ही महत्वाची आहे. भारत हा विश्व् गुरु होणार असून जगाला शांतता आम्ही देणार आहोत.

डॉ. सविता केळकर म्हणाल्या की आनंददायी शिक्षण मुलांना देणे आवश्यक आहे.यावेळी महादेव भटकर व प्राचार्य रॉय यांची मनोगत झाली. प्राचार्य डॉ. समीर ओंकार यांनी प्रास्ताविकात शाळेच्या विविध उपक्रमांसह शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला.

यावेळी विद्यार्थ्यांनी मल्लखांबाची चित्तथराक प्रत्यक्षिके सादर करीत उपस्थित्यांची वाहवा मिळवली.छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्याच्या आढावा संगीत व नृत्याचा आधारे घेत शिवकाळीन वातावरण निर्मिती केली.

भरतनाटय सह विद्यार्थ्यांनी चित्रपट गीतावर नृत्य सादर केले. संस्कृत नाटिका ही सादर करण्यात आली. काहीनी गीते सादर केली.विदयार्थ्यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमास मोठया प्रतिसाद मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button