विशेष

शिरूरचे भूमिपुत्र, देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेतील तेजस्वी नेतृत्व –आयएएस डॉ. अय्याज तांबोळी

🌸 प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌸

शिरूरचे भूमिपुत्र, देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेतील तेजस्वी नेतृत्व –

डॉ. अय्याज फकीरभाई तांबोळी यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!

 शिरूर तालुक्याने उद्योग, व्यवसाय, राजकारण, समाजकारण, शिक्षण या क्षेत्रात अनेक महनिय व्यक्तिमत्व घडवली. त्याचबरोबर शिरूरच्या या भूमीतूनही प्रशासन क्षेत्रातले अनेक दिग्गज अधिकारी घडले.त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून काम करत असताना आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर,माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यासह अनेक अधिकारी शिरूर तालुक्यातून घडले. शिरूर तालुक्याची प्रशासनाची परंपरा पुढे नेणारे अधिकारी म्हणजे डॉ. अय्याज फकीरभाई तांबोळी. दिल्ली येथे पीएमओ कार्यालयात ते कार्यरत आहेत.

शिक्षक वडील फकीरभाई तांबोळी व आई अंगणवाडी सेविका यांनी दिलेल्या संस्काराच्या शिदोरीवर डॉ. अय्याज यांनी यशाचे शिखर सर केले. संस्कारक्षम घरातून  घडलेले व्यक्तिमत्त्व, कष्ट, जिद्द, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव यांच्या जोरावर देशाच्या सर्वोच्च प्रशासकीय पातळीपर्यंत पोहोचलेले डॉ. अय्याज फकीरभाई तांबोळी हे आज शिरूर तालुक्याच्या, तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या अभिमानाचे नाव ठरले आहे.आज ते दिल्ली येथील कॅबिनेट सचिवालयात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत असून, कॅबिनेट सचिवालयात कार्य करणारे शिरूरचे पहिले भूमिपुत्र होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. हा गौरव केवळ वैयक्तिक यश नसून, शिरूरसारख्या ग्रामीण भागातील तरुणांसाठी तो एक दीपस्तंभ ठरतो.याआधी छत्तीसगड राज्यात जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी राबवलेल्या लोकाभिमुख, आरोग्यविषयक व विकासाभिमुख उपक्रमांनी प्रशासकीय सेवेचा आदर्श घालून दिला. सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेऊन त्यावर संवेदनशीलतेने उपाययोजना करणे, हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य राहिले. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला, ही बाब संपूर्ण शिरूरसाठी अभिमानास्पद आहे.

मोठ्या पदावर असतानाही विनय, नम्रता, आदरभाव आणि माणुसकी जपणारे अधिकारी म्हणून डॉ. अय्याज तांबोळी यांची स्वतंत्र ओळख आहे. पाय जमिनीवर घट्ट रोवून, आपल्या गावाकडील मित्रांमध्ये रमणारे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे डॉ. अय्याज हे आम्हा सर्व मित्रांसाठी आनंदाचा झरा आणि प्रेरणेचा स्रोत आहेत.

दिनांक २३ डिसेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, आणि राष्ट्रसेवेत आणखी मोठी उंची गाठण्याची संधी लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

शिरूरचा अभिमान – डॉ. अय्याज फकीरभाई तांबोळी! 🌺✨

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button