
शिरूर : { डेली न्यूज पोस्ट टीम 24}चांदमल ताऱाचंद बोरा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शिरूर (जि. पुणे) येथील भौतिकशास्त्र आणि (बी.व्होक रिन्यूएल एनर्जी ) विभागाच्या वतीने ‘आकाशदर्शन’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. “अंतरिक्षप्रवास : ताऱ्यांची मोहक दुनिया” या विषयावर आधारित हा कार्यक्रम शुक्रवार, दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ५ ते ८ या वेळेत बोरा महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.







