राष्ट्रीय

बालाजी विद्यालयात स्नेहसंमेलनातून देशभक्तीचा जागर

oplus_131074

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24} :बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे बालाजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय (सेमी इंग्रजी) तसेच बालाजी वर्ल्ड प्री-स्कूल यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात व जल्लोषात पार पडले. शिरूर पंचक्रोशीत शैक्षणिक गुणवत्तेसाठी वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या बालाजी शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

‘वंदे मातरम्’ या अजरामर गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने “नाद एकम्, रूपम् अनेकम्” या उत्कृष्ट संकल्पनेवर आधारित देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संस्कृती, एकता, देशप्रेम व संस्कार यांचा प्रभावी संदेश या स्नेहसंमेलनातून देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदाशिव आण्णा पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून मेजर जनरल (नि.) शिशिर महाजन, फियाट इंडिया ऑटोमोबाईल प्रा. लि.चे हेड प्रवीण गुळवे, मेजर शरद कोठावळे, सुभेदार सुरेश उमाप, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य नीरज राय, डेक्कन एज्युकेशन स्कूलचे प्राचार्य डॉ. समीर ओंकार , बालाजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक म्हसवडे, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष वसंत गव्हाणे, दत्तात्रय कापरे, , विविध गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पालक-शिक्षक संघाचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व नटराज मूर्ती पूजन तसेच दीपप्रज्वलनाने झाली. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागतगीताने उपस्थितांचे मन जिंकले. सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

वर्षभरात शैक्षणिक, क्रीडा, गायन, वादन, नृत्य तसेच शालांतर्गत व शालाबाह्य स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक विनायक म्हसवडे यांनी विद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी त्यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.

यानंतर गणेश वंदनेने विविध गुणदर्शन कार्यक्रमांना सुरुवात झाली. देशभक्तीपर समूहगीत, भारुडे, देवदेवतांचा महिमा, गायन-वादन व मनोरंजनात्मक सादरीकरणांनी कार्यक्रमात रंगत आणली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणास उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मान्यवर पाहुण्यांनी आपल्या मनोगतात बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक कार्याचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधी ओळखून पालकांनी योग्य मार्गदर्शन करावे, तसेच आर्मी, नेव्ही यांसारख्या देशसेवेच्या क्षेत्रांचा विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुख्याध्यापक विनायक म्हसवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. ललिता पोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन व नियोजन केले. उपप्राचार्य स्वाती चत्तर यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button