Uncategorized

बोरा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनाचे विशेष हिवाळी शिबीर संपन्न

 

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिर कोंढापुरी, ता. शिरूर येथे पार पडले.

शिबिराचा समारोप समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, उपप्राचार्य प्रा. एच. एस. जाधव तसेच ग्राहक पंचायतीचे धनंजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

शिबिराचे उद्घाटन शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ चे सचिव नंदकुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या राष्ट्रीय सेवा योजना चे संचालक डॉ. गणेश भामे, प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, सरपंच संदीप डोमाळे, उपसरपंच सुषमा गायकवाड यांच्यासह 175 स्वयंसेवक उपस्थित होते.

“शाश्वत विकासासाठी युवक : पाणलोट व पडीक जमीन व्यवस्थापन” या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम शिबिरादरम्यान राबविण्यात आले. स्वयंसेवकांनी गावातील ऐतिहासिक शिवकालीन वाडे, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक पैलूंचे सर्वेक्षण करून अभ्यास केला. तसेच वनराई संवर्धन, स्वच्छता अभियान, वृक्षसंवर्धन, प्लास्टिक वापराविषयी जनजागृती, प्लास्टिक कचरा संकलन व त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे कार्य करण्यात आले.

महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागामार्फत डॉ. सतीशकुमार पाटील, प्रा. अभिजीत साळुंखे, प्रा. तुषार डाळिंबकर व सहकाऱ्यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन : विज्ञानाचे प्रयोग’ हा प्रभावी कार्यक्रम सादर केला. पीक निर्मितीच्या दृष्टीने माती परीक्षणासाठी नमुने गोळा करून त्याचे परीक्षण करून देण्यात आले. प्रबोधनकार गणेश कोल्हे यांनी सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम सादर केला.

आजच्या सामाजिक व राजकीय समस्यांवर भाष्य करणारे प्रसिद्ध कवी भरत दौंडकर यांच्या उपस्थितीत प्रा. शरद रणदिवे, प्रा. गावडे, प्रा. स्नेहल आढाव व गवारे सर यांच्या सहभागाने कवी संमेलन पार पडले. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक हित व ग्राहक संरक्षण या विषयावर धनंजय गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी ‘मी ज्योतिबा फुले बोलतोय’ हा एकपात्री प्रयोग कुमार आहेर यांनी सादर केला. शाश्वत विकासाच्या दृष्टीने उद्योजकीय संधींबाबत ऍग्रो रेंजर्सचे संस्थापक सिद्धेश साकोरे, सुजल ड्रायक्लीनर्सचे संस्थापक व मॅनेजिंग डायरेक्टर संदीप लवांडे तसेच उद्योजक सोमनाथ गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.

व्यक्तिमत्त्व विकासासाठी क्षमता व कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असल्याचे आर. एम. धरिवाल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, कोंढापुरीचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. दिनेश डोके यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्पष्ट केले.

उदय हिंदुराव शिंदे यांना डेली न्यूज पोस्ट टीम 24 च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. रेणुका करपे- गायकवाड, डॉ. अशोक काकडे, प्रा.डॉ. अंबादास केत, प्रा. ओमकार धिंदळे, प्रा. दिलीप टोणगे, प्रा. विलास निचित व प्रा. अमोल पितळे आदी उपस्थित होते.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button