क्राईमराष्ट्रीय

१४ वर्षीय दिव्यांग मुलीचा अज्ञात प्राण्याचा हल्ल्यात मृत्यू; वनविभाग व पोलिसांची संयुक्त चौकशी

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24} सोनेसांगवी, ता. शिरूर येथे पहाटे एका १४ वर्षीय दिव्यांग मुलीचा अज्ञात अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.मेघना ईश्वर काळे (वय १४) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे.
पोलिसांसह वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक १४१/२०२५ नुसार नोंद करण्यात आली आहे. सोमनाथ सोनगीर काळे (वय ५०, व्यवसाय मजुरी, रा. सोने सांगवी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी खबर दिली आहे. मयत मुलीचे नाव मेघना ईश्वर काळे (वय १४, ) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कळेच्या घराजवळ राहणारी नात मेघना हिच्या गळ्याजवळ व पायाच्या मांडीवर गंभीर जखमा आढळून आल्या. ती मयत अवस्थेत होती. अज्ञात प्राण्याने हल्ला केल्याने जखमा झाल्या असाव्यात, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश कर्डिले यांनी तपास सुरू केला. घटनास्थळी वन विभागाचे मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले (RFO), शिरूर वनपरिमंडल अधिकारी पी. एस. शिंदे, तसेच नियत क्षेत्र अधिकारी एस. ए. चव्हाण यांनी भेट दिली. जुन्नर येथील माणिक डोह बिबट निवारण केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश विसलकर यांनीही घटनास्थळी पाहणी करून मयताच्या जखमेजवळील स्वॅब तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.

उदय हिंदुराव शिंदे यांना डेली न्यूज पोस्ट टीम 24 च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अज्ञात प्राण्याच्या हालचालींबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पोलिस व वनविभागाकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button