राष्ट्रीय
दोन बिबट मादी जे्रबंद

शिरूर :(डेली न्यूज पोस्ट टीम, 24}
शिरूर तालुक्यातील बिबट्याच्या वावर कायम आहे. काही माहिन्यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात दोन लहानग्यास व एका ज्येष्ठय महिलेस बिबटयाच्या हल्ल्यात प्राण गमावावे लागले होते.
या घटनानंतर ॲक्शन मोड वर आलेल्या वनखात्याने बिबटयाच्या बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना केल्या असूण बिबटयाला जे्रबंद करण्यासाठी या परिसरात मोठया संख्येने पिंजरे लावले असून मागील काही महिन्यात पिंपरखेड, सह आसपासच्या गावातून २५ हून अधिक बिबट्याना जेरबंद केले आहे.
आज सकाळी { सोमवार दिनांक २९ डिसेंबर रोजी } फाकडे व चांडोह अश्या दोन ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात दोन बिबटे जेरबंद झाले आहेत.
याबाबतची अधिक माहिती देताना तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले की
फाकटे येथील पोपट फिरोदिया यांचे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट जेरबंद झाला असून
हा बिबट्या मादी असून त्याचे वय ६ वर्ष आहे.सदर बिबट माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आला आहे.
चांडोह येथील भाऊ मारुती पानमंद यांचे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात ही बिबट जेरबंद झाला असून हा बिबट्या मादी असून ती चार वर्षाची आहे सदर बिबट माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आला आहे.





