Related Articles
Check Also
Close

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) झपाट्याने विकसित होत असताना, तिच्या मानवी आयुष्यावरील परिणामांबाबत सखोल आणि जबाबदार विचार मांडणारे चार्टर्ड अकाउंटंट वैभव जैन यांनी फ्यूचर ऑफ लाइफ इन्स्टिट्यूट आयोजित ‘कीप द फ्युचर ह्युमन क्रिएटिव्ह कंटेंट’ या आंतरराष्ट्रीय सर्जनशील लेखन स्पर्धेत १०,००० डॉलर्स (सुमारे ८.३ लाख रुपये) चे ग्रँड प्राइज पटकावले आहे.

. ‘द बटन डझन्ट एक्झिस्ट’ या त्यांच्या विजयी निबंधात एआयवर नियंत्रण मिळवण्यासाठी एखादे साधे ‘बटण’ असल्याचा समज त्यांनी ठामपणे फेटाळून लावला आहे. एआयवर प्रभावी नियंत्रणासाठी केवळ तांत्रिक उपाय पुरेसे नसून, मानवकेंद्री मूल्ये, नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी तितक्याच महत्त्वाच्या असल्याचा ठाम संदेश त्यांनी दिला आहे.





