Related Articles
Check Also
Close
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}गोलेगाव (ता. शिरूर) येथील सुपुत्र, कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक पोलीस अधिकारी पोलीस उपअधीक्षक अनिल कटके यांना उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांच्या हस्ते हे पदक देण्यात आले.




ग्रामीण भागातून पुढे येत पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनिल कटके यांनी आपल्या कार्यातून तरुणांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. मेहनत, जिद्द आणि समाजाप्रती असलेली निष्ठा यांच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते, हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.




