राष्ट्रीय
Related Articles
Check Also
Close

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}बदलत्या तंत्रज्ञानानुसार पत्रकारांनी विविध कौशल्य आत्मसात करावी.पत्रकारांनी आपल्या व्यस्त व धगाधगीचा आयुष्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केले.
पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय बारहाते, मदन काळे ,अभिजित आंबेकर,मुकुंद ढोबळे, धर्मा मैड,दीपाली काळे, अनिल सोनवणे, सुदर्शन दरेकर, पोपट पाचंगे सतीश धुमाळ आदी उपस्थित होते.पाबळे यांनी सांगितले की बदलत्या जीवनशैली मुळे ताण तणाव वाढले असून त्यांच्या शारीरिक मानसिक आरोगग्यावर परिणाम होत आहे.
पत्रकारांनी आपले आरोग्य जपावं असं आवाहन करून रुबी हॉल क्लिनिक च्या वतीने पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या साठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करावे अशी सूचना केली.




