Uncategorized

महापारेषणमध्ये निवड झाल्याबद्दल भालचंद्र शिंदे यांचा सत्कार

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}वडगाव रासाई , ता. शिरूर येथील  भालचंद्र शिंदे यांची महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) येथे वित्त व लेखा सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल यशवंत कॉलनी येथील गुरुवर्य गो. ना. वाघ स्मृती ग्रंथालय तसेच नवनिर्वाचित नगरसेविका . पूजा पुष्कराज पोटावळे आणि नगरसेवक  सागर नरवडे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना  पूजा पुष्कराज पोटावळे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी हे अत्यंत हुशार व मेहनती असतात. आज विविध क्षेत्रांत अनेक संधी उपलब्ध असून त्या संधींचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य दिशा व तयारी करणे आवश्यक आहे. विद्यार्थी घडवण्यामध्ये ग्रंथालये ही महत्त्वाची भूमिका बजावतात, असे त्यांनी नमूद केले.

या सत्कार सोहळ्यास ग्रंथालयाच्या वतीने श्री. अविनाश वाघ सर, सौ. माधुरी वाघ, श्री. चैतन्य वाघ, श्री. पुष्कराज पोटावळे आणि श्री. विनायक वाखारे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी श्री. भालचंद्र शिंदे यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button