Uncategorized
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी मिळवण्यापुरते मर्यादित न राहता भविष्यात नोकरी निर्माण करणारी मानसिकता विकसित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन म. चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर (MCCIA) चे कार्यकारी समिती सदस्य डॉ. अनंत सरदेशमुख यांनी केले.
या परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सरदेशमुख बोलत होते. त्यांनी आपल्या बीज भाषणात देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून ३५ वर्षांखालील ६५ टक्के तरुण लोकसंख्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे नमूद केले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्टार्ट-अप, नवउद्योजकता आणि नावीन्यपूर्ण विचारांकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच परिसंवादामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘पांतस्थ’ या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. हरिदास जाधव यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

