महाराष्ट्र

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}सुखकर्ता को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., मुंबईच्या शिरूर शाखेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सोसायटीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत श्री. स्वामी समर्थ सेवा संस्था , शिरूर यांना एक मेडिकल बेड भेट देण्यात आला. हा मेडिकल बेड सेवा संस्थे मार्फत शिरूर परिसरातील गरजू रुग्णांना माफक शुल्कात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तसेच कर्मचारी प्रियंका भिसे, सोनाली देशमुख आदी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना संस्थापक तानाजी मोहिते यांनी सांगितले की, सुखकर्ता को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या शिरूरसह कोल्हापूर, मुंबई, सातारा आणि सांगली या भागात शाखा कार्यरत आहेत. ग्राहकाभिमुख सेवा देत असल्याने सोसायटीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शिरूर शाखेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त गरजू रुग्णांना उपयुक्त ठरेल असा मेडिकल बेड स्वामी समर्थ सेवा संस्थे ला भेट देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शाखा व्यवस्थापक कैलास घाटगे यांनी शिरूर शाखेच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा आढावा घेतला.




