अपघात

ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू ; चालक फरार

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}: तालुक्यातील करडे गावाच्या हद्दीत लंघेवाडी येथे गुरुवारी (८ जानेवारी) दुपारी भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक घटनास्थळावरून फरार झाला असून शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उद्योजक सुवालाल पोखरणा यांना ७५ व्या वाढदिवसाच्या डेली न्यूज पोस्ट टीम 24 च्या वतीने हार्दिक शुभेच्छा
उद्योजक सुवालाल पोखरणा यांना ७५ व्या वाढदिवसाच्या डेली न्यूज पोस्ट टीम 24 च्या वतीने हार्दिक शुभेच्छा

या अपघातात कैलास मारुती गायकवाड (रा. निमोणे, ता. शिरूर) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांचे भाऊ विलास मारुती गायकवाड (वय ५४, व्यवसाय शेती) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करडे गावातील लंघेवाडी परिसरात लोखंडे फॉर्मकडे जाणाऱ्या रस्त्यावर न्यू हॉलंड कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच. १६ ए.एम. ७८०६) अतिवेगाने, निष्काळजीपणे चालविण्यात येत होता. त्याचवेळी कैलास गायकवाड हे दुचाकीवरून (एम.एच. १२ पी.वाय. ३१५८) करडे येथून निमोणेकडे जात असताना ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या दोन्ही पायांवरून गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले.

अपघाताची माहिती न देता ट्रॅक्टरचालक पळून गेल्याने परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार तसेच मोटार वाहन कायद्यान्वये अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पवार (३९८) करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button